Sakal Special : अंबासन प्राथमिक आरोग्य केंद्रात आधुनिक वैद्यकीय साहित्य; रुग्णांची गैरसोय टळणार

Sakal Special : अंबासन प्राथमिक आरोग्य केंद्रात आधुनिक वैद्यकीय साहित्य; रुग्णांची गैरसोय टळणार
esakal

अंबासन (जि. नाशिक) : येथील प्राथमिक आरोग्य (health) केंद्राला अमेरिका फाउंडेशन आणि हनीवेल संस्थेच्या सामाजिक दायित्वातून लाखो रुपयांचे वैद्यकीय साहित्य व उपकरणे उपलब्ध करून देण्यात आली आहे. (primary health center provided medical supplies equipment worth lakhs through America Foundation and Honeywell ambasan nashik news)

अंबासन प्राथमिक आरोग्य केंद्राला मिळालेल्या या उपकरणामुळे याठिकाणी उपचारासाठी दाखल होणाऱ्या रुग्णांची गैरसोय टळण्यास मदत होणार आहे. जिल्ह्यातील इतर प्राथमिक आरोग्य केंद्राप्रमाणे अंबासन प्राथमिक आरोग्य केंद्रात देखील वैद्यकीय सुविधांचा अभाव होता.

केंद्रात कुटुंब कल्याण शस्त्रक्रिया तसेच प्रसूतीसाठी अनेक अडचणींतून येथील वैद्यकीय अधिकाऱ्यांना जावे लागत होते. या अडचणींची दखल घेत उपसंचालक डॉ. कपिल आहेर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. हर्षल नेते व अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. युवराज देवरे यांनी केलेल्या पाठपुराव्यामुळे

तसेच तालुका आरोग्य अधिकारी डॉ. हर्षलकुमार महाजन यांच्या मार्गदर्शनाने प्राथमिक आरोग्य केंद्राला अमेरिका फाउंडेशन आणि हनीवेल संस्था, मुंबई यांच्या पुढाकाराने सीएसआर फंडामधून लाखो रुपयांचे वैद्यकीय साहित्य व उपकरणे नुकतेच वैद्यकीय साहित्य तसेच आधुनिक पध्दतीचे ऑपरेशन थिएटरसह विविध साहित्य उपलब्ध करून देण्यात आली आहेत. वैद्यकीय अधिकारी डॉ. राहुल मोरे व वैद्यकीय अधिकारी डॉ.अनिता सूर्यवंशी यांनी पदभार स्वीकारल्यानंतर रुग्णांच्या तक्रारी देखील घटत चालल्या आहे.

हेही वाचा : तुमच्याकडं कागदी स्वरुपातले शेअर आहेत? मग हे वाचाच....

Sakal Special : अंबासन प्राथमिक आरोग्य केंद्रात आधुनिक वैद्यकीय साहित्य; रुग्णांची गैरसोय टळणार
Nashik News: गाव विक्रीला काढलेल्या माळवाडी ग्रामस्थांच्या महसूल प्रशासनाने जाणल्या समस्या

उपलब्ध वैद्यकीय साहित्य

- नवजात बालकांना तापमान नियंत्रित करण्यासाठी वॉर्मर,
- ऑपरेशन थिएटरमध्ये आधुनिक पद्धतीचे लाइट टेबल ट्रॉलीज
- लसीकरण सत्रांसाठी लस ने- आण करण्यासाठी व्हॅक्सिन कॅरिअर
- प्रसूती कक्षात डिलिव्हरी टेबल, लाइट ट्रॉली
- औषध भंडारासाठी कपाटे
- गरोदर मातांना सेवा पुरवण्यासाठी अत्यावश्यक उपकरणे

"ऑपरेशन थिएटरमध्ये आधुनिक पद्धतीचे लाईट टेबल ट्रॉलीज पुरवण्यात आलेले आहे. त्यामुळे कुटुंब कल्याण शस्त्रक्रियेस मोठी मदत मिळणार आहे." - राहुल मोरे, वैद्यकीय अधिकारी अंबासन.

Sakal Special : अंबासन प्राथमिक आरोग्य केंद्रात आधुनिक वैद्यकीय साहित्य; रुग्णांची गैरसोय टळणार
Womens Day 2023 : वकिलांच्याच कौन्सिलवर महिलांना नाही आरक्षण; महिला आरक्षणाला मूठमाती

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com