
-सतिश निकुंभ
सातपूर : राष्ट्रीयकृतसह सर्व बँकांनी पारदर्शीपणे कामकाज करावे,उद्योजकीय ग्राहकांची अडवणूक करू नये असे प्रतिपादन करतांनाच रिझर्व बँकेचे महाव्यवस्थापक सि.बो नेखीनी यांनी सामान्यांसह उद्योजकांची रास्त प्रकरणे व विविध समस्या सोडविण्यासाठी विलंब आणि टाळाटाळ करू नये,असे निर्देश सहा महिन्या पुर्वीच निमाच्या कार्यक्रमात दिले होते. पण प्रतेक्षात देशाची अग्रगण्य आसलेल्या एसबीआय बॅंकेचे व्यवस्थापक मात्र पंतप्रधान रोजगार व मुख्यमंत्री रोजगार योजनेतील कर्ज प्रकरणाला नकार घंटा दाखवली जात आहे.