नाशिक- नागरी सेवा दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते सोमवारी (ता. २१) जिल्हाधिकारी जलज शर्मा यांचा ‘पंतप्रधान नागरी सेवा सर्वोत्कृष्टता पुरस्काराने २०२३’ सन्मान करण्यात आला. केंद्राच्या बारा प्रमुख योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीसह नाशिकच्या सर्वांगीण विकासातील उल्लेखनीय योगदानासाठी ‘जिल्ह्यांचा समग्र विकास’ श्रेणीत हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.