teacher
sakal
नामपूर: शिक्षकांना शाळास्तरावरील विविध समित्यांच्या बैठका घेऊन त्याबाबतचे इतिवृत्त ठेवताना अध्यापनाचा बराच वेळ खर्ची पडतो. त्यामुळे राज्यातील शासकीय, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांतील विविध समित्यांच्या एकत्रीकरणाच्या धर्तीवर खासगी अनुदानित शाळांमधील विविध समित्यांचेही एकत्रीकरण करण्याचा निर्णय शालेय शिक्षण विभागाने नुकताच घेतला आहे. राज्यातील खासगी शिक्षकांनी शासनाच्या निर्णयाचे स्वागत केले आहे.