private hospitals
sakal
नाशिक: महापालिकेच्या वैद्यकीय विभागाकडे प्राप्त झालेल्या तक्रारीनुसार तपासणी केल्यानंतर शहरात दोन खासगी रुग्णालये अनधिकृतरीत्या चालविले जात असल्याचे समोर आले आहे. संबंधित रुग्णालये तत्काळ बंद करण्याच्या सूचना वैद्यकीय विभागाकडून देण्यात आल्या आहेत. दोन्ही रुग्णालये अनधिकृतरीत्या चालले जात असल्याच्या पार्श्वभूमीवर महापालिका हद्दीमध्ये १७ नोव्हेंबरपासून रुग्णालय तपासण्याची मोहीम सुरू केली जाणार असल्याची माहिती मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. विजय देवकर यांनी दिली.