NMC News : खासगी मालमत्ता महापालिका सांभाळणार; विद्युत विभागाचा अजब प्रकार

NMC News
NMC News esakal

NMC News : केंद्रीय प्रदूषण नियंत्रक महामंडळाच्या सर्वेक्षणानुसार राज्यात मुंबई, पुणे पाठोपाठ नाशिक शहरातील हवेची गुणवत्ता ढासळल्याने गुणवत्ता सुधारण्यासाठी ‘नॅशनल एअर क्लीन प्रोग्रॅम’ अंतर्गत महापालिकेला ४० कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे.

निधी मंजूर करताना मार्गदर्शक तत्त्वे ठरवली आहे. त्या मार्गदर्शक तत्त्वांना गुंडाळून ठेवत मन मानेल तसा निधी खर्च केला जात असल्याचा प्रकार समोर आला आहे.

शहरात चालविल्या जाणाऱ्या घंटागाड्या सुरक्षित राहण्यासाठी पार्किंग स्थानकावर जवळपास तीस लाख रुपये खर्च करून सीसीटीव्ही बसविण्यास मंजुरी देण्यात आली आहे. (private property will be maintained by municipality nashik news )

विशेष म्हणजे किती कॅमेरे बसविले जाणार आहे, त्या कॅमेऱ्याची गरज आहे का, या प्रश्नांचे उत्तर विद्युत विभागाकडे नाही. वाहनांची चोरी होवू नये म्हणून कॅमेरे बसविण्यात आल्याचीच कबुली या विभागप्रमुखांकडून देण्यात आली आहे.

देशभरातील हवेची गुणवत्ता सुधारण्यासाठी केंद्र सरकारकडून स्थानिक स्वराज्य संस्थांना निधी दिला जातो. नाशिक महापालिका हद्दीतील हवेची गुणवत्ता ढासळल्याचे सर्वेक्षण नोंदविण्यात आल्याने त्यानुसार जवळपास ४० कोटी रुपयांचा निधी हवा गुणवत्ता सुधार कार्यक्रमासाठी मंजूर करण्यात आला.

हवेची गुणवत्ता वाढविण्यासाठी वडाळा- पाथर्डी रोडवरील गुरुगोविंदसिंग स्कूल, गंगापूर रोडवरील केटीएचएम महाविद्यालय व पंचवटी विभागातील हिरावाडीतील नाट्यगृहाजवळ हवा गुणवत्ता नियंत्रण केंद्र उभारणे, यांत्रिकी झाडू खरेदी करणे, दसक, पंचवटी व मोरवाडी येथील स्मशानभूमीत विद्युत शवदाहिनी तयार करणे, बांधकाम डेब्रिज विल्हेवाट प्रकल्प उभारणे, हवेतील नायट्रोजन, सल्फरडाय ऑक्साईड, असे सस्पेंडेड पार्टिकल मॅटर असे विषारी घटक शोषून घेणारी वनस्पती रस्ता दुभाजकांमध्ये लावणे, एकीकृत सिग्नल प्रणाली द्वारे वाहतुकीचे नियोजन करणे अशा प्रकारची कामे महापालिकेने प्रस्तावित केली. कामे पूर्णत्वास तर आली नाहीच आता आलेला निधी परतुं जाऊ नये म्हणून ठेकेदारांच्या मालमत्तांचे रक्षण करण्यासाठी तो निधी वापरला जाणार आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

NMC News
Nashik News : ग्रामस्थ भरणार घरबसल्या पाणी-घरपट्टी; ग्रामपंचायतींना क्यूआर कोड सक्तीचा

घंटागाडी चोरी होऊ नये म्हणून सीसीटीव्ही

शहरात जवळपास ३५४ घंटागाडी चालविल्या जातात. घंटागाड्यांबद्दल तक्रारी असताना आता त्याच गाड्या संरक्षित करण्यासाठी पार्किंगच्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसविले जात आहे. घंटागाडीचे मुळ मालक ठेकेदार आहे.

मालमत्ता सुरक्षित ठेवण्याची जबाबदारीदेखील ठेकेदारांचीच असताना ती वाहने चोरी जाऊ नये यासाठी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आल्याचे उत्तर अधिक्षक अभियंता उदय धर्माधिकारी यांनी दिले.

विशेष म्हणजे हवा गुणवत्ता सुधार कार्यक्रमाचा व घंटागाडी पार्किंग स्थानावर सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचा काहीच संबंध नसताना विद्युत विभागाकडून होणारे समर्थन होऊ द्या, खर्चाच्या भूमिकेशी सुसंगत असल्याचे बोलले जात आहे.

"कन्नमवार पुलाच्या दोन्ही बाजू तसेच सातपूर, अंबड, नाशिक रोड व सिडको या सहा विभागातील घंटागाडी पार्किंगच्या जागेवर सीसीटीव्ही बसविले जाणार आहे. किती कॅमेरे बसविले जातील, याची आकडेवारी नाही. अंदाजपत्रकात निधीची तरतूद आहे. या माध्यमातून घंटागाडी कधी आली व कधी गेली, हे पाहता येणार आहे. घंटागाडीची चोरी झाली तरी ते समजेल." - उदय धर्माधिकारी, अधिक्षक अभियंता, विद्युत विभाग, महापालिका.

NMC News
Nashik News : ‘कंट्रोल ब्लास्टिंग’ ने हादरले राजीवनगर; इमारती, बंगल्यांना जबरी हादरे

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com