Nashik News : ‘कंट्रोल ब्लास्टिंग’ ने हादरले राजीवनगर; इमारती, बंगल्यांना जबरी हादरे

Blasted project site.
Blasted project site. esakal

Nashik News : शुक्रवारी (ता. ११) दुपारी एक वाजता राजीवनगरमध्ये समर्थ ग्रुपचे धैर्य डेव्हलपर्स ॲन्ड बिल्डर्सच्या साइटवर पायाच्या खोदकाम करण्यासाठी जिलेटिन काड्यांचा वापर करून नियंत्रित स्फोट (कंट्रोल ब्लास्टिंग) केल्याने परिसरातील अनेक इमारती आणि बंगल्यांना जबरी हादरे बसले.

संतप्त रहिवाशांनी संबंधित काम बंद पाडून इंदिरानगर पोलिस ठाण्यात बांधकाम व्यावसायिकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. (Many buildings and bungalows in area were shaken by controlled blasting in rajivnagar nashik news)

कंट्रोल ब्लास्टिंगसाठी दिलेल्या संदर्भातील अटी आणि शर्तींचे उल्लंघन केल्याने संबंधितांविरुद्ध वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली योग्य कारवाई करणार असल्याचे इंदिरानगरचे वरिष्ठ निरीक्षक नितीन पगार यांनी स्पष्ट केले. दुपारी एकला राजीवनगरच्या मुख्य रस्त्याच्या मागील बाजूस डे केअर सेंटर शाळेकडे जाणाऱ्या उपरोक्त व्यावसायिकांची २२ मजली इमारत उभी राहत आहे.

प्रचंड स्फोटामुळे मोठा आवाज झाला. त्यामुळे अथर्व, श्रमिक, अमृतवेल आदी सोसायट्यांसह वक्रतुंड, विश्वनाथ आदी बंगल्यांना मोठे हादरे बसले. खिडक्या आणि तावदानांचे मोठे आवाज झाले. घरातील भांडी पडली. क्षणात इमारतींमध्ये राहणारे नागरिक जीव मुठीत घेऊन बाहेर धावले.

निकितेश धाकराव, भूषण पांढरकर, भूपेंद्र पांढरकर, चंद्रशेखर पांढरकर, सागर देशमुख, अजय गोवर्धने, स्वप्नील वाघ, बाळासाहेब पवार, नाना भिंगारे, तेजस सावंत, रोहित पवार आदींनी या साइटवर धाव घेतली. तेथे गेल्यानंतर जिलेटीन कांड्या वापरून स्फोट घडवून खड्डे करत असल्याचे लक्षात आले. उपस्थितांनी नागरिकांचा संताप बघून पळण्याचा प्रयत्न केला. सर्वांनी त्यांना थांबवत वापरलेल्या जिलेटिन कांड्या व साहित्याचे छायाचित्रण केले.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Blasted project site.
Nashik BSNL 4G : नॉट रिचेबल 69 दुर्गम गावात ‘बीएसएनएल’ची 4 जी टॉवर

संबंधित बांधकाम व्यावसायिकदेखील पळून गेल्याचे नागरिकांनी सांगितले. नागरिकांनी इंदिरानगर पोलिस ठाण्यात जाऊन सविस्तर माहिती दिली. विंचूर येथील भाऊसाहेब गायकवाड या कंट्रोल ब्लास्टिंग व्यावसायिकांनी गुन्हे शाखेचे सहाय्यक आयुक्त डॉ. सीताराम कोल्हे यांच्याकडून परवानगी घेतली होती.

मात्र इंदिरानगर पोलिसांना पाच दिवस आधी याबाबत माहिती देण्याची अट त्यात होती. मात्र, कोणतीही कल्पना देण्यात आली नाही, असे इंदिरानगर पोलिसांनी स्पष्ट केले. सामाजिक कार्यकर्ते समीर शेटे, सचिन कुलकर्णी, ह्णषीकेश वर्मा आदी नागरी वस्तीत कंट्रोल ब्लास्टिंगसाठी परवानगी देऊ नये याबाबत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देणार आहे. संबंधित बिल्डरवर कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली आहे.

"एवढ्या दाट लोकवस्तीमध्ये अशा प्रकारच्या स्फोटासाठी सरकारी यंत्रणा परवानगीच कशी देते, हे आश्चर्यकारक आहे. कोणतीही खबरदारी न घेता काम सुरू असून, स्थानिकांचा जीव धोक्यात घालण्याचा प्रकार सुरू आहे." - निकितेश धाकराव, स्थानिक नागरिक.

"कानठळ्या बसवणारा आवाज होता. चार महिन्यांपासून दिवस-रात्र या ठिकाणी वापरण्यात येणाऱ्या ब्रेकर्समुळे होणारे ध्वनिप्रदूषण आणि धुळीचा त्रास सहन करत आहोत. आजचा प्रकार मात्र खूप भयावह होता." - चंद्रशेखर पांढरकर, स्थानिक नागरिक.

Blasted project site.
Nashik News : ग्रामस्थ भरणार घरबसल्या पाणी-घरपट्टी; ग्रामपंचायतींना क्यूआर कोड सक्तीचा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com