निष्काळजीपणानेच घेतला प्रियंकाचा बळी; दोषी डॉक्टरांवर गुन्हा दाखल

priyanka nirbhavane & People Chandwad police station limits demanding to file a case against the culprits.
priyanka nirbhavane & People Chandwad police station limits demanding to file a case against the culprits.esakal

चांदवड / गणूर (जि. नाशिक) : मंगरूळ ता. चांदवड येथील महिलेचा प्रसूतीनंतर उदभवलेल्या अनेक गुंतागुंतीच्या कारणांमुळे मृत्यू झाल्याची घटना ता. २४ रोजी घडली. प्रियंका विकी निरभवणे (वय२४) असे मृत महिलेचे नाव असून अवघ्या दोन महिन्यांच्या चिमुकल्या लेकराला घेऊन नातेवाईकांनी संबंधित दोषी डॉक्टरांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी करत चांदवड पोलीस स्थानक आवारात तीव्र आक्रोश व्यक्त केला. यावेळी प्रियंका हीचा मृतदेह देखील आवारातच ठेवण्यात आल्याने दिवसभर तणावपूर्ण शांतता परिसरात होती.

नातेवाईकांच्या आक्रोशानंतर तात्काळ जिल्हा शल्यचिकित्सकांच्या अध्यक्षेतेखाली समिती स्थापन करून तपास करण्यात आला. समितीच्या अहवालानंतर रात्री उशिरा चांदवड येथील खासगी रुग्णालय व पिंपळगाव येथील खासगी रुग्णालयातील दोषी डॉक्टरांविरुद्ध अखेर गुन्हा दाखल करण्यात आला. (Priyanka nirbhavane died after giving birth to child case has been registered against 5 guilty doctor at chandwad nashik Latest Marathi News)

प्रियंका निरभवणे हिला आठव्या महिन्यानंतर प्रसूती कळा सुरू झाल्याने चांदवड येथील खाजगी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. येथे सिझेरियन करून तिची प्रसूती करण्यात आली. काही दिवसांत गोंडस बाळाला घेऊन प्रियंका आपले पती विकी यांच्या समवेत घरी गेली मात्र अचानकपणे पोटाचा त्रास जाणवू लागल्याने तिला पुन्हा हॉस्पिटलमध्ये आणण्यात येऊन पोटावर शस्त्रक्रिया करण्यात आली.

यानंतर त्रास संपेल असं वाटत असतांना आणखी त्रास वाढला यावर अधिक उपचारासाठी पिंपळगाव येथील खाजगी हॉस्पिटलमध्ये तिला संदर्भित करण्यात आले. पिंपळगाव बसवंत येथे देखील दोन टप्यात जवळपास २१ दिवस उपचार व दोन शस्त्रक्रिया केल्यानंतर तिला अत्यावस्थ अवस्थेत नाशिक येथे हलविण्यात आले. मात्र प्रकृती आणखी खालावत गेल्याने प्रियंका ला केईएम हॉस्पिटल मुंबई येथे उपचारार्थ दाखल करण्यात आले. मात्र ता. २४ रोजी तिचा मृत्यू झाला.

चांदवड-पिंपळगाव येथील खाजगी डॉक्टरच प्रियंका च्या मृत्यूस कारणीभूत असल्याचं सांगत चांदवड पोलीस स्टेशन आवारात प्रियकांच्या मृतदेहासह ठिय्या देत नातेवाईकांनी आक्रोश व्यक्त केला. प्रियंका हिने नुकत्याच जन्म दिलेल्या नवजात बाळाला घेऊन नातेवाईकांनी दोषी डॉक्टरांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी केली.

यावर जिल्हा शल्यचिकित्सकांचा अहवाल आल्याशिवाय गुन्हे दाखल करता येत नसल्याचे पोलिसांनी सांगून देखील नातेवाईक ता.२६ रोजी दिवसभरात पोलीस स्थानक आवारात ठाण मांडून होते. वेळोवेळी उपविभागीय पोलीस अधिकारी समिरसिंह साळवे, पोलीस निरीक्षक समीर बारावकर यांनी नातेवाईकांची समज काढण्याचा प्रयत्न केला. शेवटी जिल्हा शल्य चिकित्सकांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करण्यात आली व अहवालाची प्रतीक्षा करण्यात आली.

priyanka nirbhavane & People Chandwad police station limits demanding to file a case against the culprits.
भरदिवसा वृद्धेची पर्स पळवली मखमलाबाद रोडवरील प्रकार; घटना CCTVमध्ये कैद

दरम्यान अप्पर पोलीस अधीक्षक चंद्रकांत खांडवी यांनी देखील चांदवड ला भेट देत परिस्थितीचा आढावा घेत नातेवाईकांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला यावर रात्री उशिरा पोलिसांनी मृतदेह कडक बंदोबस्तात मंगरूळ या गावी पाठवला येथे नातेवाईकानी मृतदेह स्वीकारला मात्र रात्री उशिरापर्यंत पाऊस सुरु असल्याने त्यावर अंत्यसंस्कार होऊ शकले नव्हते सोबतच जिल्हा शल्य चिकितसकांच्या अहवालाची देखील सर्वानाच प्रतीक्षा लागून होती.

प्रियंका वर उपचार केलेली सर्व कागदपत्रे व तक्रारी अर्ज तपासल्यानंतर जिल्हा शल्यचिकित्सकांच्या तज्ञ समितीने याप्रकरणात सिजेरीयन शस्त्रक्रियेनंतर झालेल्या गुंतागुंतीचे वेळी योग्य निदान व वेळेत उपचार करण्यात विलंब झालेला असल्यामुळे यात निष्काळजीपणा झालेला असल्याचा अभिप्राय दिला त्यानूसार पोलिसांनी चांदवड येथील खासगी रुग्णालय व पिंपळगाव येथील खासगी रुग्णालयातील ६ डॉक्टरांवर भारतीय दंड संहिता१८६० नुसार कलम ३०४, ३०४ अ, ३४ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. प्रियंकाचा पोलिस ठाण्यात आणलेला मृतदेह अखेर अहवालानंतर मंगरूळ येथे नेऊन मध्यरात्री तिच्यावर अत्यंत शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.

priyanka nirbhavane & People Chandwad police station limits demanding to file a case against the culprits.
Nashik : लहान मुले पळविणाऱ्या टोळीची अफवा ; पोलिसांचे आवाहन

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com