Pro Vice Chancellor Nikumbh statement about All Medical Colleges in process of NAAC nashik news
Pro Vice Chancellor Nikumbh statement about All Medical Colleges in process of NAAC nashik newsesakal

Nashik Medical College : सर्व वैद्यकीय महाविद्यालये वर्षभरात ‘NAAC’ च्‍या प्रक्रियेत : प्रति-कुलगुरू निकुंभ

Nashik Medical College : महाराष्ट्र आरोग्‍य विज्ञान विद्यापीठाशी संलग्‍न असलेल्‍या सर्व महाविद्यालयांनी ‘नॅक’ मूल्‍यांकन करून घ्यावे, यासाठी त्‍यांना प्रोत्‍साहित केले जाते आहे. येत्‍या वर्षभरात सर्व वैद्यकीय महाविद्यालये ‘नॅक’ मूल्‍यांकनाच्‍या प्रक्रियेत येतील,

अशी अपेक्षा विद्यापीठाचे प्रति-कुलगुरू डॉ. मिलिंद निकुंभ यांनी व्‍यक्‍त केली आहे. मूल्‍यांकन प्राप्त महाविद्यालयांना तपासणीत तीन वर्षांची सूट देण्यासह अन्‍य विविध सवलती दिल्‍या जात आहेत. (Pro Vice Chancellor Nikumbh statement about All Medical Colleges in process of NAAC nashik news)

अधिक माहिती देताना प्रति-कुलगुरू डॉ.निकुंभ म्‍हणाले, की सद्यःस्‍थितीत विद्यापीठाशी संलग्‍न २० टक्‍के महाविद्यालयांचे ‘नॅक’ मूल्‍यांकन झालेले आहे. सर्वच महाविद्यालयांनी ही प्रक्रिया पूर्ण करावी, यासाठी त्‍यांना प्रोत्‍साहित केले जात आहे. ऐरवी सर्व महाविद्यालयांनी वार्षिक स्वरूपात ‘एलआयसी’ या समितीमार्फत तपासणी होत असते.

परंतु ‘बी प्‍लस’ व त्‍यावरील मूल्‍यांकन असलेल्‍या महाविद्यालयांना तीन वर्षांकरिता संलग्‍नता देताना एकप्रकारे सवलत दिली जाते आहे. पुढील वर्षभरात विद्यापीठाशी संलग्‍न सर्व महाविद्यालयांनी ‘नॅक’ मूल्‍यांकनाच्‍या प्रक्रियेत सहभागी करून घेतले जाणार आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Pro Vice Chancellor Nikumbh statement about All Medical Colleges in process of NAAC nashik news
Nashik BJP News: लोकसभा व विधानसभा निवडणुकीसाठी भाजपची तयारी; आहेर, सानप यांच्यावर दोन्ही संघाची जबाबदारी

ही प्रक्रिया पूर्ण होण्यासाठी तीन वर्षांचा कालावधी लागत असतो. त्यामुळे येत्‍या तीन वर्षांमध्ये विद्यापीठाशी संलग्‍न मोठ्या संख्येने महाविद्यालयांना नॅकचे मूल्‍यांकन मिळालेले असेल, असा विश्‍वास डॉ. निकुंभ यांनी व्‍यक्‍त केला.

मार्गदर्शनासाठी ‘नॅक सेल’

महाविद्यालयांना ‘नॅक’ मूल्‍यांकनाच्‍या प्रक्रियेबद्दल सखोल मार्गदर्शन करण्यासाठी विद्यापीठात ‘नॅक सेल’ ची स्‍थापना केलेली आहे. तसेच क्‍वालिटी ॲश्युरन्स सेलच्‍या माध्यमातून दर्जा उंचावण्यासाठी सहाय्यता केली जाते आहे. मूल्‍यांकन प्रक्रियेसंदर्भात माहिती देताना, समस्‍या सोडवणुकीसाठी मदत केली जात असल्‍याचे डॉ.निकुंभ यांनी सांगितले

Pro Vice Chancellor Nikumbh statement about All Medical Colleges in process of NAAC nashik news
Nashik 11th Admission : या वर्षी अकरावीच्या 26 हजार 720 जागा; सतराशेंनी भरला भाग दोन

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com