New Sand Policy: नवीन वाळू धोरणाचा फज्जा; तिसऱ्यांदा फेरनिविदा! वाळू लिलावाकडे ठेकेदारांची पाठ

जिल्ह्यातील घाटांवर वाळूचे प्रमाण कमी असणे, स्थानिकांचा विरोध तसेच वाळूचा दर्जा कमी असल्याने ठेकेदार या वाळू लिलावाकडे पाठ फिरवत असल्याचे सांगितले जाते.
New Sand Policy
New Sand Policyesakal

नाशिक : नवीन वाळू धोरणानुसार जिल्ह्यातील बागलाण, कळवण, देवळा, नांदगाव व मालेगाव या पाच तालुक्यांतील २० वाळूघाटांसाठी जिल्हा खनिकर्म विभागाला तिसऱ्यांदा फेरनिविदा प्रसिद्ध करावी लागली आहे. यात सहभागी होण्यासाठी मंगळवार (ता. १३)पर्यंत मुदत आहे.

जिल्ह्यातील घाटांवर वाळूचे प्रमाण कमी असणे, स्थानिकांचा विरोध तसेच वाळूचा दर्जा कमी असल्याने ठेकेदार या वाळू लिलावाकडे पाठ फिरवत असल्याचे सांगितले जाते. (problem in New Sand Policy Renewed for third time Contractor avoid to sand auction nashik news)

प्रत्येक निविदेवेळी लिलावाची रक्कम २५ टक्के कमी करण्याची नामुष्की जिल्हा प्रशासनावर ओढवली आहे. राज्य सरकारने गेल्या वर्षी जाहीर केलेल्या नवीन वाळू धोरणानुसार सर्वसामान्य नागरिकांना ६०० रुपये ब्रास या दराने वाळू देण्याचा, तसेच घरकुल योजनांच्या लाभार्थ्यांना मोफत वाळू देण्याचा निर्णय घेतला आहे.

यात लाभार्थ्यांना केवळ वाहतूक खर्च करावा लागेल. यामुळे या नवीन वाळू धोरणाचे राज्यात स्वागत झाले. नवीन वाळू धोरण राज्यात १ मे २०२३ पासून लागू करायचे होते; पण निविदा प्रक्रिया पूर्ण न होऊ शकल्याने त्याचा मुहूर्त टळला.

त्यासाठी नाशिक जिल्ह्यात १३ वाळूघाटांना परवानग्या दिल्या होत्या. मालेगाव तालुक्यात पाच, कळवण, देवळा व बागलाण या तीन तालुक्यांत आठ घाट व एकूण सहा डेपो निश्चित करण्यात आले होते.

त्यातून ९० हजार टन वाळूचा उपसा होणार होता. पण, निविदाप्रक्रिया जूनपर्यंत पूर्ण होऊ शकली नाही. यामुळे या धोरणाची जिल्ह्यात अंमलबजावणी झाली नाही.

जिल्ह्यात पावसाळ्यापूर्वी केवळ निफाड तालुक्यातील चेहेडी येथे वाळू डेपो सुरू झाला. मागील हंगामात निविदेला प्रतिसाद न मिळाल्याने जिल्हा खनिकर्म विभागाने ऑक्टोबर २०२३ मध्ये फेरनिविदा प्रसिद्ध केली होती.

New Sand Policy
Nashik MADA Lottery: शहरातील बांधकाम प्रकल्पांची माहितीसाठी ‘DO लेटर’! नगर रचना विभागाची माहिती संकलित करण्यासाठी धावपळ

या प्रक्रियेला प्रतिसाद मिळाला नाही. यामुळे जिल्हा खनिकर्म विभागाने फेरनिविदा राबविण्याचा निर्णय आहे. दरम्यान, जिल्ह्यातील वाळूची प्रतवारी घसरणे, वाळूचे प्रमाण कमी तसेच प्रस्तावित वाळूघाटांना स्थानिकांचा विरोध आहे.

यामुळे ठेकेदार या लिलाव प्रक्रियेपासून दूर राहत असल्याचे सांगितले जाते. यामुळे शासनाच्या तिजोरीलाही फटका बसत आहे.

या वाळूघाटांचा लिलाव

बागलाण : धांद्री, नामपूर, द्याने

कळवण : देसगाव, नाकोडे, कळवण बुद्रुक, वरखेडा, पाळे खुर्द

देवळा : ठेंगोडा बंधारा

नांदगाव : न्यायडोंगरी

मालेगाव : पाटणे, चिंचावड, आघार खुर्द, येसगाव बुद्रुक, सवंदगाव, सावतावाडी, वडनेर, वळवाडी, अजंग

New Sand Policy
Nashik News : राज्य बियाणे उपसमितीच्या बैठकीत 26 अन्नधान्य, फळपिकांची शिफारस

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com