नाशिक- सध्या विविध व्यावसायिक अभ्यासक्रमांची प्रवेशप्रक्रिया सुरू आहे. या अंतर्गत शिक्षणशास्त्र अभ्यासक्रमांच्या प्रवेशाच्या नोंदणीला मुदतवाढ देण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार आता सीईटी दिलेल्या पात्रताधारक विद्यार्थ्यांना २९ जुलैपर्यंत मुदत असेल. पदवी, पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमांचा यात समावेश आहे.