Construction of idol collection center
Construction of idol collection centeresakal

मिरवणूक मार्गावर NMCकडून विशेष सुविधा; आयुक्तांकडून अधिकाऱ्यांना सूचना

Published on

नाशिक : चार दिवसांनी गणराया परतीच्या प्रवासाला निघणार असल्याने त्या पार्श्वभूमीवर महापालिकेने विसर्जन स्थळ व मिरवणूक मार्गावर विशेष सुविधा पुरविण्याचे नियोजन केले आहे. यंदा नदीपात्रात गणेशमूर्ती विसर्जन करण्यास पूर्णपणे बंदी असल्याने मूर्ती संकलन केंद्र उभारले जात आहे. त्याचबरोबर नैसर्गिक विसर्जन स्थळावर सुरक्षेसाठी बॅरेकेटिंग केले जात आहे. (Special facilities from NMC on procession route Instructions from NMC Commissioner Nashik Latest Marathi News)

महापालिका आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी मुख्य मिरवणूक मार्गाची पाहणी केली. पोलिस आयुक्तांसह चार किलोमीटर पायी फेरफटका मारत योग्य त्या सुविधा पुरविण्याच्या सूचना दिल्या. वीज वितरण कंपनीच्या वीजतारांचा अडथळा दूर करणे, रस्त्यावरील खड्डे बुजविणे, रस्त्यांची झाडलोट करणे, दुभाजकांची स्वच्छता, मिरवणूक मार्गावर तात्पुरत्या स्वच्छतागृहांची उभारणी आदी प्रकारच्या सूचना त्यांनी बांधकाम व आरोग्य विभागाला केल्या.

महापालिकेकडून एकूण ७१ श्रीगणेश विसर्जन स्थळांची निर्मिती केली जात आहे. यात २९ पारंपारिक नैसर्गिक तळांसह ४२ कृत्रिम तलाव उभारले जाणार आहे. दारणा नदीवरील चेहेडी येथे धोकादायक स्थिती असल्याने येथे बॅरिकेटिंग करण्यात आले आहे. पश्चिम विभागात अहिल्यादेवी होळकर पुलाखालील गाळ काढण्याच्या सूचना दिल्या आहे.

चोपडा लॉन्स, तपोवन कपिला संगम, सीता सरोवर, पूर्व विभागातील संगम घाट, पवन नगर, वडनेरगाव, पिंपळगाव खांब येथील विसर्जन स्थळावरील गाळ व माती हटवून स्वच्छतेच्या सूचना देण्यात आल्या. पश्चिम विभागात घाट रोड, पार्किंगकरिता ठेवले जाणार आहे. सातपूर विभागातील प्रभाग क्रमांक २६ येथील गणेश घाटाची साफसफाई करण्यात आली असून, येथे कच पसरविण्यात आली आहे.

सातपूर आत्मा मलिक गणेश विसर्जन ठिकाणी विहिरींची साफसफाई करण्यात आली. त्याचप्रमाणे वाहने विसर्जन स्थळी पोचण्यासाठी खडीकरण करण्यात आले. सातपूर प्रभाग क्रमांक आठमध्ये गणेशनगर येथील रस्ता जीएसबी मटेरिअलने दुरुस्त करण्यात आला. मिरवणूक मार्गावरील साइड पट्ट्यांची गवत काढण्यात आले. प्रभाग क्रमांक दहामध्ये अंबड लिंक रोडवरील नंदिनी पुलाखाली जाणारा रस्ता दुरुस्त करण्यात आला.

Construction of idol collection center
शहरातील सराईत गुन्हेगार जेरबंद; गावठी पिस्तुल, 2 जिवंत काडतूस जप्त

मिरवणूक मार्गावरील रस्त्यांची डागडुजी

मिरवणूक मार्गावरील रस्त्यांची डागडुजी व दुरुस्ती केली जात आहे. पश्चिम विभागातील संभाजी चौक ते उंटवाडी पूल दरम्यान मिरवणूक मार्गावरील खड्डे बुजविण्यात आले. रविवार कारंजा येथील मिरवणूक मार्गावर डांबराचे पॅच मारण्यात आले. रामवाडी पूल येथील खड्डे बुजविण्यात आले. महाराष्ट्र नॅचरल गॅस कंपनीकडून अंबड व नाशिक रोड भागात खोदलेले खड्डे बुजविण्यात आले.

सातपूर विभागात प्रभाग क्रमांक ११ मध्ये रिलायन्स पेट्रोलपंप टीडीके कंपनी दरम्यानच्या रस्त्यावरील खड्डे बुजविण्यात आले. सातपूरच्या प्रभाग क्रमांक २६ मध्ये आयटीआय पूल परिसरातील खड्डे तसेच पूर्व विभागातील प्रभाग क्रमांक २३ मधील जेएमसीटी कॉलेज समोर डीपी रस्त्यावरील रस्त्यांची दुरुस्ती करण्यात आली. पेट्रोल एसटी वर्कशॉपजवळ पाण्याचा निचरा करण्यात आला. नाशिक रोड विभागातील जयहिंद नगरला तुटलेले ढापे बदलण्यात आले. नाशिक- पुणे महामार्गावर बीएम मटेरिअलने पॅचवर्क करण्यात आले.

Construction of idol collection center
गणेशोत्सवाची सातासमुद्रापार कॅलिफोर्नियात धुम!

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com