नाशिक: सिंहस्थ विकासकामांसाठी आवश्यक असलेला विकास निधी, १५व्या वित्त आयोगाचा निधी व थकबाकीचा वाढता डोंगर लक्षात घेता महापालिकेच्या विविध कर विभागाने जम्बो सवलत योजना लागू केली आहे. घरपट्टी थकबाकी एकरक्कम अदा केल्यास दंडाच्या रकमेत ९५ टक्क्यांपर्यंत सवलत दिली जाणार आहे. सवलतीचा लाभ घेण्यासाठी स्वतःहून पुढाकार घेण्याबरोबरच महापालिकेतर्फे ३.२८ लाख थकबाकीदारांना विशेष नोटीस बजावली जाणार आहे.