Nashik News | ऐंशी चौक, रस्त्यांचे जातिवाचक नावे बदलण्याचे प्रस्ताव | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

nashik city 1.jpg

नाशिक | ऐंशी चौक, रस्त्यांचे जातिवाचक नावे बदलण्याचे प्रस्ताव

sakal_logo
By
विक्रांत मते

नाशिक : रस्ते, चौक, वस्त्यांना जातिवाचक नावे देण्याची प्रथा बंद करण्याबरोबरच यापूर्वी देण्यात आलेली जातिवाचक नावे बदलण्यासाठी महापालिकेकडे एकूण ८० प्रस्ताव विभागीय अधिकाऱ्यांकडून सादर करण्यात आले आहे. महासभेवर प्रस्ताव सादर करण्यासाठी गुरुवारी (ता. १८) नामकरण समितीची महत्त्वाची बैठक आयुक्त कैलास जाधव यांनी बोलाविली आहे.

राज्याच्या समाजकल्याण विभागामार्फत गेल्या वर्षी एक अध्यादेश काढण्यात आला. त्यात रस्ते, चौक, वाडे, गल्ल्यांना जातिवाचक दिलेली असल्यास ते बदलण्यात यावीत, अशा सूचना आहेत. शहरात अनेक भागात रस्ते, चौक व गल्ल्यांना जातिवाचक नावे देण्यात आली आहेत. त्यातून एका विशिष्ट जातीची वस्ती असल्याचे प्रतिपादित होऊन त्यातून सामाजिक सलोखा राहत नसल्याने नावे बदलण्याचे शासनामार्फत सुचविण्यात आले. त्यासंदर्भातील परिपत्रक महापालिकेच्या समाजकल्याण विभागाला प्राप्त झाले. त्यानुसार अंमलबजावणी सुरू झाली. महापालिकेच्या सहा विभागीय अधिकाऱ्यांना त्यासंदर्भात सूचना करण्यात आले होते. त्यानुसार ८० नावे बदलण्याचे प्रस्ताव सादर करण्यात आले आहेत. जातिवाचक नावे बदलण्याबरोबरच नवीन नावे देण्यासंदर्भात गुरुवारी (ता.१८) आयुक्तांनी बैठक बोलाविली असून, त्यानंतर महासभेवर प्रस्ताव सादर केला जाणार आहे. महासभेच्या मंजुरीनंतर जातिवाचक नावे असलेल्या चौक, रस्त्यांना नवीन नावे मिळतील.

हेही वाचा: 'मिया भाई' फेम रॅपरने सोडली म्युझिक इंडस्ट्री, म्हणाला इस्लाममध्ये..

गावठाणात जातिवाचक नावे

शहरात पंचवटी, जुने नाशिक गावठाणात सर्वाधिक जातिवाचक नावे असलेले रस्ते, गल्ल्या आढळून आल्या आहेत. त्याचबरोबर नावे देताना नगरसेवकांच्या प्रस्तावावर नामकरणाचे ठराव झाल्याची बाब आढळून आली आहे. विशेष म्हणजे महापालिकेत नामकरण समिती गठित असताना समितीच्या परवानगीशिवाय विविध रस्त्यांना नावे दिली जात असल्याची बाब सर्वेक्षणातून समोर आली आहे.

हेही वाचा: गुगलने बॅन केले 'हे' 7 Android अ‍ॅप्स; फोनमधून लगेच करा डिलीट

loading image
go to top