Nashik Crime News: शरणपूर रोडवर स्पाच्या नावाखाली देहव्यापार; 6 महिलांची सुटका | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Crime News

Nashik Crime News: शरणपूर रोडवर स्पाच्या नावाखाली देहव्यापार; 6 महिलांची सुटका

नाशिक : शरणपुर रोडवर सुयोजीत मॉर्डन पॉईट या बिल्डींगमध्ये ‘योग वेलनेस स्पा’ या नावाने सुरू असलेल्या मसाज पार्लरवर शहर गुन्हे शाखेच्या मध्यवर्ती गुन्हे शाखेने छापा टाकून कारवाई केली.

या ठिकाणी मसाज पार्लरच्या नावाखाली वेश्या व्यवसाय सुरू होता. यावेळी ६ महिलांची सुटका करण्यात आली असून, एक महिला व गाळा मालकासह पाच जणांविरुद्ध सरकारवाडा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत मध्यवर्ती गुन्हे शाखेचे उपनिरीक्षक सुनील माळी यांना गोपनीय माहिती मिळाली होती. त्यानुसार संबंधीत इमारतीत संशयित अनेश अरुण उन्हवणे (रा. उपनगर) याने दोन गाळे भाडे तत्त्वावर घेवुन त्या ठिकाणी ‘योग वेलनेस स्पा’ नावाने मसाज पार्लर सुरू करत मसाज पार्लरच्या नावाखाली वेश्या व्यवसाय चालत होता.

वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉ. अंचल मुदगल यांच्या पथकाने याबाबत खात्री झाल्याने तेथे छापा टाकला. मसाज पार्लरच्या नावाखाली एक संशयित महिला व ललित पांडुरंग राठोड हे महिलांना पैशांचे प्रलोभन देवुन त्यांच्याकडुन अनैतिक देहव्यापार करून घेताना सहा पिडीत महिला आढळल्या. त्यांची सुटका करण्यात आली.

अनेश उन्हवणे याने हा गाळा सागर ओमकार अग्रवाल, पियुष ओमकार अग्रवाल यांच्याकडून भाडेतत्वावर घेतला होता. दरम्यान, हे तिघेही फरारी असून, सरकारवाडा पोलीसांत अनैतिक व्यापार प्रतिबंध कायद्यान्वये गुन्हा दाखल झाला आहे.

पोलीस आयुक्य अंकुश शिंदे, उपायुक्त प्रशांत बच्छाव, सहाय्यक आयुक्त वसंत मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉ. अंचल मुदगल, सहायक निरीक्षक कुंदन सोनोने, धर्मराज बांगर, सुनील माळी, विजय शिरसाठ, शेरखान पठाणे, किशोर देसले, विजय कडाळे, बेबी ठाकरे, दीपक पाटील, दशरथ निंबाळकर, भरत हिंडे, निलीमा निकम, वैशाली घरटे, प्रजित ठाकूर यांनी ही कारवाई केली.

टॅग्स :NashikCrime News