बांधकाम व्यावसायिक संजय बियाणी यांच्या हत्येचा मालेगावात निषेध

बांधकाम व्यावसायिक संजय बियाणी यांच्या अमानुष हत्येचा मालेगाव येथील माहेश्वरी प्रगती मंडळातर्फे तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला.
protest
protestesakal

मालेगाव (जि. नाशिक) : नांदेड येथील माहेश्वरी समाजाचे प्रसिध्द बांधकाम व्यावसायिक संजय बियाणी यांची ५ एप्रिलला भरदिवसा त्यांच्या राहत्या घराजवळच काही अज्ञात गुंडांनी गोळ्या झाडून निर्घृणपणे हत्या केली. या अमानुष हत्येचा मालेगाव येथील माहेश्वरी प्रगती मंडळातर्फे तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला. मंडळातर्फे अपर जिल्हाधिकारी माया पाटोळे यांना निवेदन देण्यात आले.

हत्येने संपुर्ण राज्य हादरले

यावेळी मालेगाव माहेश्वरी प्रगती मंडळाचे जिल्हाध्यक्ष ओमप्रकाश सारडा, मालेगावचे अध्यक्ष कल्पेश हेडा, सचिव राजेश जाखोट्या, समीर मुंदडा यांच्या नेतृत्वाखाली नाशिक जिल्हा माहेश्वरी सभा, महेश वरिष्ठ सभा, माहेश्वरी युवा मंच, श्री राजस्थानी मंडळ, अग्रवाल सेवा समिती, श्री राजस्थान सेवा समिती, राजस्थान शिक्षण प्रसारक मंडळ, छन्यातीय विप्र मंडळ, जनाधिकार रक्षा मंचतर्फे निवेदन देण्यात आले. निवेदनात,आम्ही नाशिक जिल्हा माहेश्वरी महासभा, सर्व स्तरीय नागरिक, सामाजिक संस्था, सर्व समाजबांधव, सर्व शांतता प्रिय कायद्याचे पालन करणारे नागरिक सामाजिक कार्यकर्ते, गरिबांचे कैवारी श्री. बियाणी यांची भरदिवसा रस्त्यात गोळी झाडून हत्या करण्यात आल्याने राज्य हादरुन गेले. या घटनेचा आम्ही तिव्र शब्दात निषेध करत आहोत. दोषींना त्वरित अटक करुन कठोरात कठोर शिक्षा देण्यात यावी, जेणेकरून परत कोणी अशा प्रकारच्या हत्या करण्याचे धाडस करणार नाही. संविधानाने दिलेल्या हक्कानुसार निडरपणे सर्वसामान्यांना आपलं जीवन नीट जगता येईल.

protest
उन्हाच्या झळांनी हैराण मालेगावकरांना तापमान घसरल्याने दिलासा

यावेळी हरिकिशन जाखोट्या,मुरली चांडक, मधु काबरा, राधेश्याम काळा, नटवर काबरा, कमल झंवर, गोपाळ झंवर, अंकुश बडालिया, राकेश डिडवानिया, अशोक सराफ,अजय मंडावेवाला, निशांत मंत्री, सतीश कलंत्री, बंडू माहेश्वरी, नवनीत तापडिया, महेश मारू आदी सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते.

protest
नाशिक : आयुक्त पांडेजी, शिकवू नका; माफी मागा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com