PSI Success Story: कोरोनामुळे लग्न टळलं अन् फार्मासिस्ट मनिषानं थेट फौजदार होऊन यशाचं शिखर गाठलं!

Grandmother Gangubai Davere Father Sande Davere Mother Chhaya Davere Sister Sakshi Davere Brother Vishal Davere celebrating by cutting a cake after Manisha Sanda Davere became the first police officer.
Grandmother Gangubai Davere Father Sande Davere Mother Chhaya Davere Sister Sakshi Davere Brother Vishal Davere celebrating by cutting a cake after Manisha Sanda Davere became the first police officer.esakal
Updated on: 

दत्ता खुळे : सकाळ वृत्तसेवा

PSI Success Story : समाजात मुलींना उच्च शिक्षित करायचं मग तिचं लग्न ठरावयचं अशी नवीन संकल्पना रुजत आहे. त्यात ज्या पालकांना अधिक मुली असतील तर त्यांचे उच्च शिक्षण करताना मुलींचे वाढतेय वय अन् सामाजिक मन यांची सांगड घातली पाहिजे असा मत प्रवाह आहे.

उच्च शिक्षण झाले म्हणून मुलींचे लग्न करायचं ठरले अन् करोना महामारी संकट पुढे आले. त्यामुळे पालकांनी मुलीला पुढे इच्छेनुसार कॅरिअर करण्याची संधी मिळाली. (PSI Success Story due to corona marriage canceled konambe Pharmacist Manisha davare became psi nashik)

कोनांबे (ता.सिन्नर )येथील शेतकरी कुटुंबातील केमिस्टस् (बी फाॅर्मसी )औषधनिर्मिती मनिषा वाळू डावरे ही ने पाहुण्यांच्या सांगण्यानुसार महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परिक्षा दिली अन् कोनांबे सारख्या बागायतदारांच्या गावात फौजदार पदाचं पहिलं गोंदण केले आहे.

कोनांबेतील पहिली मुलगी पोलिस उपनिरीक्षक झाली आहे. शेतकरी वाळू शंकर डावरे यांच्या शेतकरी कुटुंबातील धाकटी मुलगी मनिषा डावरे आहे. श्री. डावरे यांना सोनाली डावरे सहाणे साक्षी डावरे विशाल डावरे चार मुले आहेत. स्वत शेतकरी पदवीधर आहेत.

त्यामुळे तीन मुलींना उच्च शिक्षित केले. धाकटी मुलगी मनिषा कोनांबेला दहावी झाल्यानंतर सिन्नर ला बारावी सायन्स नंतर फाॅर्मसी साईट घेतली‌. चिंचोलींच्या प्रवरा काॅलेज मध्ये बी फाॅर्मसी पुर्ण केले. कुटूंबात मुली असल्याने डावरे परिवाराने मनिषा लग्न करून देण्याचा निर्णय घेतला.

विवाहासाठी इच्छुक स्थळ शोधण्यास सुरुवात केली. मात्र करोना काळ सुरू असल्याने ही प्रक्रिया थांबली अन् मनिषाला जणू यशाची चाहूल लागली. डावरे यांचे जावई सावरगाव पाट (ता ‌.अकोले) येथील गणेश सहाणे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेतून महिला बालकल्याण विभागात अधिकारी झाले आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Grandmother Gangubai Davere Father Sande Davere Mother Chhaya Davere Sister Sakshi Davere Brother Vishal Davere celebrating by cutting a cake after Manisha Sanda Davere became the first police officer.
PSI Success Story: इंजिनियर गायत्रीची पोलिस उपनिरिक्षक पदाला गवसणी! अथक परिश्रमाला अखेर यश

त्यांनी मनिषाची गुणवत्ता क्षमता ओळखून एम पी एस सी परिक्षा देण्याचा सल्ला दिला. तो जावईचा सल्ला आज लाखमोलाचा ठरला आहे. मनिषा ने सिन्नर शहरात माजी आमदार राजाभाऊ वाजे यांनी उभारलेल्या लोकनेते अभ्यासिका जाण्यास सुरुवात केली.

सिन्नर शहरात असणार्या अभ्यासिकेत वडिलांनी जाण्यास परवानगी दिली. आज डावरे परिवारातील धाकटी मुलगी मनिषा फौजदार होऊन यशस्वी ठरली. मनिषाने केलेले कष्ट जाव ईचा सल्ला अन् लग्न न करण्याचा घेतला निर्णय हा मार्ग कोनांबेकरांच्या इतिहास घडवणारा ठरला आहे. उच्च शिक्षित मुलींच्या आयुष्यात हा क्षण सोनेरी झाला आहे.

"मला एम फाॅर्मसी करायचं होते.पण घराच्या आर्थिक स्थिती ने ते राहिले.स्पर्धा परिक्षा देण्यांचा सल्ला मिळाला आहे.श्रेणी एक पद मला मिळवण्याचे आहे.त्यासाठी अभ्यास करण्याचा प्रयत्न आहे."- मनिषा वाळू डावरे, पोलीस उपनिरीक्षक

"मुलीचं लग्न करण्याचा निर्णय घेतला होता.पण करोना कालावधी हा निर्णय थांबविला.मोठे जाव ई यांनी मनिषा क्षमता ओळखून स्पर्धा परीक्षा करण्याचा निर्णय दिला.मला अभिमान वाटतो की मुलगी पहिली गावाची फौजदार झाली आहे."- वाळू शंकर डावरे, मनिषाचे वडील, कोनांबे

Grandmother Gangubai Davere Father Sande Davere Mother Chhaya Davere Sister Sakshi Davere Brother Vishal Davere celebrating by cutting a cake after Manisha Sanda Davere became the first police officer.
PSI Success Story: MPSCच्या पहिल्या प्रयत्नात रोहितची पोलीस उपनिरीक्षक पदाला गवसणी!

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.