PSI Success Story: पोलिस भरतीचा नाद सोडून थेट स्पर्धा परीक्षा दिली अन् पठ्ठ्या पहिल्याच प्रयत्नात यशस्वी

Akshay Ratan Zagde felicitated former MLA Rajabhau Waje father Ratan Zagde mother Surekha Zagde brother Sachin Zagde Poonam Golesar Vivek Golesar Suresh Zagde
Akshay Ratan Zagde felicitated former MLA Rajabhau Waje father Ratan Zagde mother Surekha Zagde brother Sachin Zagde Poonam Golesar Vivek Golesar Suresh Zagdeesakal

PSI Success Story : कॅरिअरच्या वाटा महाविद्यालयात शिक्षण घेत असताना घडतात. त्यात होतकरू मित्रांची साथ अन् संगत असेल तर चुकणारी वाट थांबत नवीन दिशा ऊर्जा देणारी ठरते.

सिन्रर शहराच्या डोंगर माथ्यावर पारंपारिक पद्धतीने शेतकरी कुटुंबातील अक्षय रत्न झगडेला पोलीस होण्याचं वेड लागले होते. पण लवकर पोलिस भरती प्रक्रिया निघेना म्हणून मित्रांनी समजावले. (PSI Success Story Passed mpsc psi exam akshay jhagade succeeded in first attempt nashik)

त्यांच्या योग्य स्पर्धा परीक्षेच्या मार्गदर्शन मुळे राज्यशास्त्र पदवीधर असलेला अक्षय महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत पहिल्या प्रयत्नात पोलिस उपनिरीक्षक पदासाठी यश मिळवले आहे.

सिन्नर शहरातील जिरे माळी समाजात थेट स्पर्धा परीक्षा देऊन झालेला पहिला फौजदार होण्याचा मान अक्षयला मिळाला आहे. नाशिक पुणे महामार्गावर सिन्नर बायपासला डोंगर माथा उताराला झगडे मळा शेतकरी रतन नामदेव झगडे यांचा मुलगा अक्षय आहे.

सिन्नरच्या जनता विद्यालयात दहावी झाल्यानंतर सिन्नर महाविद्यालयात बारावी सायन्स झाला. शेतकरी कुटूंब असल्याने भाऊ सचिन सह वडीलांना शेतात मदत करावी या हेतूने कला शाखेत पदवीधर होण्याचा निर्णय घेतला.

काॅलेज जवळ असल्याने शिक्षण घेऊन पोलीस भरती प्रक्रिया करण्याची दिशा ठरवली. राज्यशास्तात पदवीच्या दुसरा वर्षात असताना पोलिस भरतीची तयारी केली. महामार्गावर शेतमळा शेजारी सराव केला.

सातत्याने सराव करत असताना शासनातर्फे पोलिस भरती वेळेत झाली नाही. त्यामुळे काॅलेज मित्रांनी हा पोलिस होण्याचा नाद सोडून दे असे सुनावले. जेवढे प्रयत्न पोलीस भरती साठी करतोय त्यापेक्षा कमी श्रमात स्पर्धा परीक्षा दिल्यास अधिकारी होईल असे मार्गदर्शन केले.

त्यामुळे अक्षयने राज्यशास्त्र पदवीधर होऊन लोकसेवा आयोगाच्या परिक्षा देण्याचा निर्धार केला. 2019 ला पदवी घेऊन अक्षय ने पुणे गाठले. येथे पोलिस उपनिरीक्षक साठी स्पर्धा परीक्षा क्लासेस सुरू केला.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Akshay Ratan Zagde felicitated former MLA Rajabhau Waje father Ratan Zagde mother Surekha Zagde brother Sachin Zagde Poonam Golesar Vivek Golesar Suresh Zagde
PSI Success Story : गंगाधरीतील मेंढपाळाच्या मुलाची पोलिस उपनिरीक्षक पदाला गवसणी

पण पहिली परिक्षा झाली.दुसरी परिक्षा वादात अडकली. त्यामुळे अक्षय दोन वर्षांनंतर घराकडे आला. स्पर्धा तयारी करण्यासाठी मित्रांनी माजी आमदार राजाभाऊ वाजे यांच्या लोकनेते अभ्यासिका अक्षयला जाण्यास सांगितले.

हा क्षण अक्षय झगडेंसाठी जीवनाला कलाटणी देणारा झाला आहे. पोलीस होण्यासाठी जो स्वयंप्रेरणेने जो अभ्यास केला तो येथील अभ्यासिकेत उपयोगात आला आहे. लोकनेते मध्यें तयारी करणारे पाच पोलिस उपनिरीक्षक झाले.

त्यातील अक्षय हा कला शाखेत पदवीधर होऊन फौजदार होणार ठरला आहे. त्यांने इतर कोणताही व्यावसायिक अभ्यासक्रम केला नाही ‌झगडे परिवार शेतकरी कुटूंब आहे. त्यात अक्षय पोलिस होईल वाटत होतं पण चक्क फौजदार झाल्याने खूप आनंदी कुटूंब झाले आहे.

पोलिस होण्याचं स्वप्न होतं.घरी सराव केला.पण ही भरती झाली नाही.मित्रांच्या सांगण्याने हा नाद सोडला.कला शाखेत पदवी घेऊन फौजदार झालोय आहे.लोकांसाठी सेवा करणे हे स्वप्न पूर्ण झाले आहे. - अक्षय रतन झगडे, झगडे मळा

"अक्षय खुप कसोटी ने स्पर्धा परिक्षेची तयारी केली.भाऊ सचिन सह आम्ही सर्वांनी त्याच्या पाठीशी उभे राहिलो.मोठा मुलगा शेती संभाळत असल्याने अक्षय नोकरी करावी असं वाटतं होते.आज त्याने करून दाखवले"- सुरेखा रतन झगडे अक्षय ची आई

Akshay Ratan Zagde felicitated former MLA Rajabhau Waje father Ratan Zagde mother Surekha Zagde brother Sachin Zagde Poonam Golesar Vivek Golesar Suresh Zagde
PSI Success Story: शेतकरी कुटुंबातील इंजिनिअर मुलगा झाला पुतळेवाडीचा पहिला फौजदार!

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com