Latest Marathi News | थकीत कर वाहनांचा 14 सप्टेंबरला जाहीर लिलाव | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

e auction news

थकीत कर वाहनांचा 14 सप्टेंबरला जाहीर लिलाव

नाशिक : मोटार वाहन कर न भरलेल्या व मोटार वाहन कायद्यातील विविध गुन्ह्यात जप्त केलेल्या १२८ तीन चाकी वाहनांचा १४ सप्टेंबरला सकाळी अकराला जाहीर ई-लिलाव करण्यात येणार असल्याची माहिती उपप्रादेशिक परिवहन अधिकारी प्रदिप शिंदे यांनी दिली. या ई- लिलावात सहभाग घेण्यासाठी इच्छुकांनी ९ सप्टेंबरपर्यंत नोंदणी करावी, असे आवाहन विभागाकडून करण्यात आले आहे. (Public auction of overdue tax vehicle on September 14 nashik Latest Marathi News)

हेही वाचा: Ganeshotsav 2022 : देखावे पाहण्यासाठी गणेशभक्‍तांची रीघ

जाहीर ई- लिलावात सहभाग घेण्यासाठी इच्छुक नागरिकांनी www.eauction.gov.in या संकेतस्थळावर नोंदणी करावी. प्रादेशिक परिवहन कार्यालय, नाशिक येथे २५ हजार रुपये रक्कमेचा आरटीओ नाशिक या नावाने अनामत धनाकर्ष (डिमांड ड्राफ्ट) व २ हजार रुपये लिलाव शुल्कासह नाव नोंदणी करून कागदपत्रांची पूर्तता करणे आवश्यक आहे.

लिलाव करण्यात येणारी वाहने राज्य परिवहन महामंडळ कार्यशाळा, पेठ रोड, नाशिक येथे पाहणी करण्यासाठी उपलब्ध करून देण्यात आली असून या लिलाव प्रक्रियेत जीएसटी धारकांनाच सहभाग घेता येणार आहे.

हेही वाचा: Nashik : नैसर्गिक फुलांनी उजळले गुलशनाबाद!

Web Title: Public Auction Of Overdue Tax Vehicle On September 14 Nashik Latest Marathi News

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Nashikauctionvehiclestax