Sarvajanik Vachanalaya
sakal
नाशिक: सुमारे १८५ वर्षांची परंपरा असलेल्या सार्वजनिक वाचनालयाचे संकेतस्थळ दिवाळीनंतर अद्ययावत करण्याचा निर्णय कार्यकारी मंडळाच्या नुकत्याच झालेल्या बैठकीत घेण्यात आला. यामुळे वाचनालयात राबविण्यात येणाऱ्या विविध योजना, उपक्रमांची माहिती, पुस्तकांची उपलब्धता आणि वाचनालयाची इत्यंभूत माहिती आता वाचकांना एका क्लिकवर मिळणार आहे.