लॉकडाऊनची ऐशीतैशी! मालेगावात जनता राज; अर्ध शटर उघडून विक्री

जिल्ह्यात अन्यत्र कडक लॉकडाउन जाहीर झाल्यानंतर मंगळवारी खरेदीसाठी तोबा गर्दी उसळली होती. शहरवासीयांना मात्र शहरात जणूकाही या कठोर निर्बंधांचे पालन होणार नाही अशी खात्रीच होती.
The public does not Follow strict restrictions
The public does not Follow strict restrictionse-sakal

मालेगाव (जि. नाशिक) : जिल्ह्यात बुधवार (ता. १२) पासून कडक लॉकडाउन(Lockdown) जाहीर झाला आहे. कोरोना संसर्ग(Corona virus) रोखण्यासाठी प्रशासनाने कठोर निर्बंध लागू केले आहेत. मात्र या निर्बंधांची सर्रास ऐशीतैशी झाली. पोलिस(Police), महापालिका व महसूल प्रशासनासह यंत्रणेच्या नाकावर टिच्चून शहरात सर्व काही सुरळीत सुरू होते. पूर्व भागातील बाजारपेठेत मोठी गर्दी होती. पूर्वेकडील गर्दी पाहून धाडसाने पश्‍चिमेकडेही अर्ध शटर उघडून बहुसंख्य व्यावसायिकांचे काम सुरू होते. अपुऱ्या मनुष्यबळाअभावी निर्बंधांची अंमलबजावणी करताना प्रशासनाची तारांबळ उडाली. (The public does not Follow strict restrictions)

सण येताच निर्बंध धाब्यावर

रमजान ईदचा(Ramzan-Eid) मुख्य सण व अक्षय तृतीया दोन दिवसावर येऊन ठेपल्याने निर्बंधांना हरताळ फासला गेला. जिल्ह्यात अन्यत्र कडक लॉकडाउन जाहीर झाल्यानंतर मंगळवारी खरेदीसाठी तोबा गर्दी उसळली होती. शहरवासीयांना मात्र शहरात जणूकाही या कठोर निर्बंधांचे पालन होणार नाही अशी खात्रीच होती. यामुळे मंगळवारी जेमतेम गर्दी झाली होती. बुधवारीच अनेकांनी रमजान ईद व अक्षय तृतीयेची खरेदी केली. जागोजागी आंबे विक्री करणाऱ्या हातगाड्या, दुचाकीवर नाहक चकाट्या पिटणारे तरुण, रस्त्यावर, चौकात घोळक्याने उभे राहून मस्ती करणाऱ्यांच्या टोळ्या असे सारे वातावरण होते. मोसम पूल, शिवाजी पुतळा, रावळगाव नाका अशा काही मोजक्या ठिकाणी बॅरेकेडिंग व पोलिस आढळले. मोहंमद अली रोड, किदवाई रोड गर्दीने वाहत होता. कॅम्प(camp) भागात काही प्रमाणात कठोर निर्बंधांचे पालन झाले. प्रशासनानेच जणू काही मूकसंमती दिल्याचे जाणवत होते. एकूणच कठोर निर्बंधांची अंमलबजावणी प्रशासनासमोर आव्हान ठरणार आहे.

The public does not Follow strict restrictions
Nashik Lockdown : टवाळखोरांना पोलिसांकडून दंडूक्याचा प्रसाद! पाहा VIDEO
The public does not Follow strict restrictions
सेलिब्रेटी-नेत्यांना रेमडेसिव्हिर, ऑक्सिजन कसं मिळतंय? कोर्टाचा सवाल

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com