सार्वजनिक बांधकाम विभाग करणार पर्यायी रस्त्यांची व्यवस्था

PWD
PWDesakal

नाशिक : पावसाच्या पाण्यामुळे (Rainwater) रस्ते अथवा पूल बंद झाल्यास सार्वजनिक बांधकाम विभागाकडून (Public Works Department) त्या रस्त्यांना पर्यायी व्यवस्था होणार आहे. त्या पद्धतीने नियोजन व यंत्रणा विभागाने सज्ज ठेवली आहे. आपत्तकालीन (Emergency) परिस्थितीत घटनास्थळी तांत्रिक कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्याचे नियोजनही विभागाकडून करण्यात येत आहे. (Public Works Department will arrange alternative roads in monsoon Nashik News)

PWD
Nashik : महाराष्ट्र दुय्यम सेवा मुख्य परीक्षा जुलैत

जीर्ण झालेले पूल, रस्ते खराब होणे व जुन्या झालेल्या इमारती मान्सून काळात पडण्याचा धोका लक्षात घेऊन मान्सूनपूर्वीच त्यांचे सार्वजनिक बांधकाम विभागाकडून स्ट्रक्चरल ऑडिट करण्यात येते. त्यामुळे वित्तीय अथवा जीवितहानी होण्याचा धोका टाळता येतो. पावसाच्या पाण्यामुळे रस्ते, पुलांवरील वाहतूक बंद करण्यात येते. त्यादरम्यान पर्यायी रस्त्यांची व्यवस्था करणे आवश्यक असल्याने त्यासाठी लागणाऱ्या साहित्याचे नियोजनासाठी इ-निविदा प्रक्रिया राबवून आवश्यक साहित्याची व्यवस्थाही सार्वजनिक बांधकाम विभागाकडून करण्यात येत आहे. पावसामुळे बंद केलेले रस्ते, पूल व त्यासाठी केलेल्या पर्यायी व्यवस्थेची माहिती आणि आवश्यक नकाशे जिल्हा आपत्ती नियंत्रण कक्षासह परिवहन कार्यालय, एसटी बस सेवा, महसूल व पोलिस, उपविभागीय अधिकारी, तहसीलदारांना सार्वजनिक बांधकाम विभागाकडून सांगण्यात येत आहे.

PWD
Nashik : विधी, शिक्षणशास्‍त्र सीईटी नोंदणीची 22 पर्यंत मुदत

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com