International Film Festival : पुण्याच्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात गिरकीला दिग्दर्शनाचा पुरस्कार

Kavita Dater accepting the directorial award at the International Film Festival
Kavita Dater accepting the directorial award at the International Film Festivalesakal

नाशिक : पुणे इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवलमध्ये यंदा नाशिकच्या कविता दातीर (Kavita Datir), पुण्याचे अमित सोनावणे दिग्दर्शित ‘गिरकी’ या मराठी चित्रपटाला ‘सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक (स्पेशल मेन्शन)’ या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. (Pune International Film Festival Award for Director for film Girki nashik news)

सुप्रसिद्ध अभिनेत्री विद्या बालन व सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते या पुरस्काराचे वितरण करण्यात आले.

वर्षभरात तयार झालेल्या मराठी चित्रपटांपैकी सर्वोत्तम सात चित्रपट महोत्सवातील मराठी चित्रपट स्पर्धेमध्ये सहभागी झाले होते. या वेळी ज्येष्ठ दिग्दर्शक जब्बार पटेल, ज्येष्ठ चित्रपट अध्यापक समर नखाते, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील उपस्थित होते.

डॉमनिक लॉशेर (स्वित्झर्लंड येथील फिल्ममेकर), मॅरिटा हॉलफोर्स (फिनलँड येथील सिनेमॅटोग्राफर), पी. शेषाद्री (कन्नड फिल्ममेकर) या तिघांनी स्पर्धेत ज्युरी म्हणून काम सांभाळले. अभिनेत्री श्रेया बुगडे, अभिनेता स्वप्नील जोशी यांनी सूत्रसंचालन केले. २ ते ९ फेब्रुवारी दरम्यान चालू असलेल्या या चित्रपट महोत्सवाचा समारोप झाला.

हेही वाचा : अल्पमतातील निवाडे आणि सामान्य माणूस

Kavita Dater accepting the directorial award at the International Film Festival
Nashik News : ओव्हरलोडिंग वाहने मोकाटच! प्रकल्पाच्या नावाखाली गौण खनिजाची नियमबाह्य वाहतूक

‘गिरकी’चे शिलेदार

गिरकी हा ९५ मिनिटांचा चित्रपट असून त्याच्या लेखन व दिग्दर्शनाची बाजू कविता दातीर आणि अमित सोनावणे या दिग्दर्शकद्वयींनी सांभाळली आहे. चित्रपटाचे निर्माते गणेश शिंदे, कविता दातीर हे असून कॅमेरा रोशन मरोडकर व संकलन अमित सोनावणे यांनी केले आहे.

‘पुष्पक विमान’, ‘खारी बिस्कीट’ फेम सुयश झुंझुरके, ‘तू माझा सांगाती’, ‘सुंदर मनामध्ये भरली’ फेम प्रमिती नरके हे प्रमुख भूमिकांमध्ये आहे. कविता दातीर यांचे वडील भगवान दातीर यांनी चित्रपटासाठी कार्यकारी निर्माता या पदाचा भार वाहिला आहे.

Kavita Dater accepting the directorial award at the International Film Festival
SAKAL Special : ZP शाळांना मैदानाचा अन् क्रीडा शिक्षकांचा अभाव!; खेळ, क्रीडा विकास कसा होणार?

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com