Balasaheb Thorat
sakal
संगमनेर: नाशिक-पुणे रेल्वेमार्ग संगमनेरमार्गेच व्हावा, यासाठी माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्यासह आम्ही पाठपुरावा केला. २०१२ मध्ये हा मार्ग मंजूर झाला. मात्र आता रेडिओ दुर्बिणीचे कारण दाखवले जात आहे. त्यावर पर्याय म्हणून दुर्बिणीच्या लांब क्षेत्रावरून रेल्वे नेता येईल आणि हा संगमनेरवरूनच गेला पाहिजे हा आपला आग्रह आहे. याप्रश्नी आपण संगमनेर-अकोल्याच्या जनतेसोबत असल्याचे खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांनी सांगितले.