नाशिक: पुण्यातील ‘रेव्ह पार्टी’तून पोलिसांनी ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांचे जावई डॉ. प्रांजल खेवलकर यांना ताब्यात घेतले आहे. खडसेंना पोलिसांच्या कारवाईचा संशय होता, तर त्यांनी जावयाला ‘अलर्ट’ करायला हवे होते. त्यांचा जावई काय लहान मुलगा आहे का, त्याला कुणीतरी कडेवर उचलून घेतले आणि रात्री तीन-चारला पार्टीत नेऊन बसविले, असा प्रतिप्रश्न जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी येथे माध्यमांशी बोलताना उपस्थित करत खडसेंना ‘फॅमिली’कडे लक्ष देण्याचा सल्लाही दिला.