Jal Jeevan Missionच्या कामांत दिरंगाई झाल्यास दंडात्मक कारवाई होणार

Zilla Parishad Chief Executive Officer Leena Bansod
Zilla Parishad Chief Executive Officer Leena Bansodesakal

नाशिक : जलजीवन मिशन कार्यक्रमांतर्गत सुरु असलेल्या कोणत्याही कामांमध्ये अनियमितता अथवा दिरंगाई आढळून आल्यास सर्व संबंधितांवर दंडात्मक कारवाई करण्यात येईल असा इशारा जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांनी दिला आहे. (Punitive action will be taken in case of delay in work of Jal Jeevan Mission ZP CEO Leena Bansod nashik Latest Marathi news)

जिल्हा परिषदेत ग्रामीण पाणीपुरवठा विभागाची आढावा बैठकीत त्या बोलत होत्या. संपूर्ण जिल्ह्यात पाणी पुरवठ्यासंबंधी सुरू असलेल्या कामांचा त्यांनी तालुकानिहाय आढावा घेतला. जिल्ह्यात पाणीपुरवठा संबंधी सुरू असलेल्या ४७६ योजनांमध्ये १०० टक्के नळ जोडणी करून एकही आदिवासी वाडी व वस्ती पाणी पुरवठ्यापासून वंचित राहू नये असे निर्देश त्यांनी प्रशासनास दिले.

जिल्ह्यात यावर्षी १३५८ गावांमध्ये पाणी पुरवठ्यासंबंधीची कामे प्रस्तावित आहेत. जलजीवन मिशनमार्फत सुरु असलेल्या कामांबाबत महिन्यातून एक वेळा सर्व तालुक्यातील उपअभियंता यांनी कंत्राटदारांचा योजनानिहाय आढावा घेऊन प्रगतीपर अहवाल जिल्हास्तरावर सादर करावा.

जल जीवन मिशन कार्यक्रमांतर्गत कार्यादेश दिलेल्या मक्तेदारानेच अथवा त्यांनी अधिकृत नेमणूक केलेल्या व्यक्तींनीच प्रत्यक्ष कामावर हजर राहतील याची दक्षता घ्यावी. कोणतेही काम इतर नोंदणीकृत नसलेल्या मक्तेदारास दिल्याचे निदर्शनास आल्यास संबंधित कंत्राटदाराचा मक्ता तात्काळ रद्द करण्यात येईल असे सांगितले.

Zilla Parishad Chief Executive Officer Leena Bansod
ZP Election : निवडणुका लांबणार; किमान सदस्यसंख्येचा मुद्दा

कामे गुणवत्तापूर्वकच करा

जलजीवन मिशनची प्रभावी अमंलबजावणी करण्याकरीता सर्व उपअभियंता व शाखा अभियंता यांनी वेळोवेळी आढावा घेऊन, योजनेची प्रत्यक्ष पाहणी करून कामात कोणत्याही प्रकारची तडजोड न होता कामे गुणवत्तापूर्वक व विहित मुदतीत पूर्ण होतील याबाबत नियोजन करण्याच्या सूचना दिल्या.

कार्यकारी अभियंता पुरुषोत्तम भांडेकर, शाखा अभियंता विनोद देसले, कनिष्ठ प्रशासन अधिकारी महेंद्र पवार, प्रमोद निरगुडे, प्रदीप अहिरे, कौशल पात्रे, हर्षा पजई, सर्व तालुक्यातील उपअभियंता, कनिष्ठ अभियंता, अधिकारी व कर्मचारी यांच्यासह मक्तेदार उपस्थित होते.

Zilla Parishad Chief Executive Officer Leena Bansod
NMC Election : दीड महिन्यात निवडणुका शक्य; आरक्षणासह मतदारयादी बदलणार

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com