esakal | मका, ज्वारी, बाजरीची होणार हमीभावाने खरेदी; 'असा' मिळेल हमीभाव
sakal

बोलून बातमी शोधा

food grain

मका, ज्वारी, बाजरीची होणार हमीभावाने खरेदी; असा मिळेल हमीभाव

sakal_logo
By
संतोष विंचू

येवला (जि.नाशिक) : शेतकऱ्यांना आधार वाटणाऱ्या शासनाच्या आधारभूत किंमत खरेदी योजनेंतर्गत मका, ज्वारी, बाजरी खरेदीसाठी नावनोंदणी करण्याला सुरुवात झाली आहे. जिल्ह्यात नऊ केंद्रावर ही खरेदी होणार आहे. यावर्षी मकाला क्विटलला हमीभाव १ हजार ८७० रुपये भाव मिळणार आहे. जिल्हा मार्केटिंग अधिकाऱ्यांनी याबाबतच्या सूचना दिल्या आहेत. देवळा, सिन्नर, नामपूर येथे नाव नोंदणी सूरु झाली असून इतर केंद्रावर देखील नोंदणीला प्रारंभ होणार आहे.

३० तारखेपर्यंत नावनोंदणी करण्याचे आवाहन

शेतकऱ्यांच्या शेतमालाला उत्पादन खर्चाच्या तुलनेत भाव मिळावा यासाठी केंद्र दरवर्षी आधारभूत किंमत निश्चित करते. त्यानुसार शासकीय खरेदी केली जाते, ही खरेदी शेतकऱ्यांना हक्काची व चार जास्त पैसे देणारी ठरत असल्याने नंबर लावून शेतमाल विक्री होतो.

जिल्हा मार्केटिंग अधिकारी विवेक इंगळे यांनी नाव नोंदणीबाबतचे आवाहन केले आहे. अद्याप मका शेतातच असून काढणी झालेली नसताना नाव नोंदणी सुरू झाल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. त्यातही खासगी बाजारात भाव टिकून असल्याने हमीभावाच्या खरेदीला कितपत प्रतिसाद मिळणार हे मकाची काढणी झाल्यानंतरच समजणार आहे. शेतकऱ्यांनी दिलेल्या कागदपत्रांनुसार पोर्टलवर ऑनलाईन नोंदणी केली जाणार आहे. गोदामे उपलब्धता व सर्व नियोजन करून नंतरच खरेदीचा निर्णय होऊ शकतो. खासगी बाजारात शेतमालाचे भाव घसरतात, त्यावेळेस हमीभावाची खरेदी नक्कीच आधार ठरते.मात्र नाव नोंदणी करताना शेतकऱ्यांचा मोठा प्रतिसाद मिळतो परंतु ७० टक्के शेतकरी खरेदीपासून वंचित राहत असल्याने ज्यांनी-ज्यांनी नावनोंदणी केली त्या सर्वांची मका खरेदी करावी अशी मागणी शेतकरी करत आहेत.

येवल्यात नोंदणी सुरू

शेतकऱ्यांनी चालू हंगामातील मका, ज्वारी, बाजरी इत्यादी पीक केल्याची नोंद असलेला सातबारा उतारा, सेविंग बँक खाते क्रमांकासाठी बँकेच्या खात्याची पासबुकची झेरॉक्स, आधार कार्ड व मोबाईल नंबरसह इतर सर्व कागदपत्रांसह तालुका खरेदी-विक्री संघात नाव नोंदणीसाठी संपर्क साधण्याचे आवाहन येवला संघाचे व्यवस्थापक बाबा जाधव यांनी केले आहे.

मका विक्रीसाठी शेतकऱ्यांची ऑनलाईन नावनोंदणी सुरू झाली आहे. केंद्राच्या जाहीर दराप्रमाणे शेतकऱ्यांना दर मिळणार आहे. विक्रीसाठी मका,

बाजरी व ज्वारी एफ.ए.क्यु दर्जाची व स्वच्छ चाळलेली, वाळवलेली, काडीकचरा, घाण विरहित असावी. आर्द्रता १४ टक्क्यांच्या आत असावी.

- विवेक इंगळे,जिल्हा मार्केटिंग अधिकारी

-असा मिळेल हमीभाव (प्रति क्वि.)

* मका - १८७०

* ज्वारी मालदांडी - २७३८

* ज्वारी हायब्रीड - २७५८

* बाजरी - २२५०

* रागी - ३३७७

----------------

१६-१ ही चौकट जात नसले तर रद्द करणे.

---------

-जिल्ह्यात येथे होईल मका खरेदी

- खरेदी विक्री संघ,सिन्नर

- खरेदी विक्री संघ,येवला

- खरेदी विक्री संघ,चांदवड

- खरेदी विक्री संघ, लासलगाव

- शनेश्वर सहकारी संघ,नांदगाव

loading image
go to top