Nashik News: पिंपळगाव खांब येथे स्वतंत्र जलवाहिनी टाका; महापालिकेने नियुक्त केलेल्या संस्थेचा सल्ला

NMC Nashik News
NMC Nashik Newsesakal
Updated on

Nashik News : औद्योगिक क्षेत्रातील कारखान्यांच्या माध्यमातून बाहेर पडणारे केमिकलयुक्त सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पात आणखी एक अडथळा निर्माण झाला आहे.

घरगुती सांडपाण्याच्या आउटलेटला औद्योगिक वसाहतीतील सांडपाण्याची लाइन जोडण्यास नकार देताना पिंपळगाव खांब येथील मलनिस्सारण केंद्रात स्वतंत्र वाहिनी टाकण्याचा सल्ला महापालिकेने नियुक्त केलेल्या सल्लागार संस्थेने दिला आहे.

त्यासाठी पर्यावरण विभागाचा ‘ना हरकत’ दाखला आणण्याची जबाबदारी देखील औद्योगिक विकास महामंडळाकडे सोपविली. (Put separate water channel at Pimpalgaon Khamb Advice from organization appointed by Municipal Corporation Nashik News)

सातपूर व अंबड औद्योगिक वसाहतीमध्ये गंगापूर धरणातून पाणीपुरवठा होतो. पाण्याचा वापर होऊन तयार झालेल्या सांडपाण्यावर शास्त्रीय पद्धतीने प्रक्रिया करणे आवश्यक असते. त्याची जबाबदारी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाची आहे.

मात्र औद्योगिक विकास मंडळाकडे सांडपाण्यावर प्रक्रिया करण्याची व्यवस्था नाही. त्यामुळे महापालिकेने सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प तयार करावा, अशी मागणी करण्यात आली होती. परंतु महापालिकेने औद्योगिक विकास महामंडळाची जबाबदारी असल्याची भूमिका घेतल्याने गेल्या अनेक वर्षांपासून त्यावर वाद आहे.

काही महिन्यांपूर्वी या विषयावर उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या बैठकीत तोडगा काढण्यात आला. अमृत दोन योजनेंतर्गत औद्योगिक सांडपाण्यावर प्रक्रिया करणारा प्रकल्प उभारण्याचा निर्णय घेण्यात आला.

प्रकल्पाची एकूण किंमत २० कोटी आहे. मात्र औद्योगिक सांडपाण्याचे आउटलेट महापालिकेच्या ड्रेनेज लाइनला जोडल्यास सहा कोटी रुपयांपर्यंत खर्च येणार असल्याने तत्काळ मार्ग काढण्याच्या अनुषंगाने हा पर्याय स्वीकारण्यात आला.

मात्र महापालिकेने सल्लागार संस्थेची नियुक्ती करून सविस्तर प्रकल्प अहवाल मागविला. त्यासाठी दोन कोटी १६ लाख रुपये देखील संबंधित संस्थेला देण्यात आले.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

NMC Nashik News
Crop Insurance Scheme : निफाड तालुक्यात 6 हजार शेतकऱ्यांनी काढला पीकविमा; आपत्ती, नुकसानीत मिळणार दिलासा

महापालिकेच्या आउटलेटला जोडण्यास नकार

औद्योगिक सांडपाण्यावर प्रक्रिया करण्यासाठी निर्माण होणाऱ्या केंद्रात, तसेच पुढे प्रक्रियायुक्त पाणी वाहून नेण्यासाठी महापालिकेच्या मलनिस्सारण वाहिन्यांना जोडण्याच्या निर्णय घेण्यात आला होता.

मात्र महापालिकेच्या वाहिन्यांना औद्योगिक वसाहतीतील सांडपाण्याची वाहिनी जोडल्यास त्याचा परिणाम मलनिस्सारण केंद्राच्या क्षमतेवर व जैविक घटकांवर देखील होईल. औद्योगिक सांडपाण्यात केमिकलयुक्त तसेच जड धातू असल्याने गुणवत्तेवर परिणाम होईल.

मल-जल वाहिनीला जोडल्या जाणाऱ्या औद्योगिक सांडपाण्यात सल्फेटचे उच्च प्रमाण असते. या सल्फेटचे सल्फाईडमध्ये रूपांतर होऊन हायड्रोजन सल्फाईड तयार होईल.

परिणामी, सीवर नेटवर्क पाइपलाइन खराब होऊ शकते, असे अहवालात नमूद करण्यात आले. त्यामुळे महापालिकेच्या आउटलेटला औद्योगिक सांडपाण्याची लाइन जोडण्यास नकार देण्यात आला आहे.

NMC Nashik News
Mid Day Meal Corruption : मध्यान्ह भोजन योजनेत भ्रष्टाचार; कामगार आयुक्त मार्फत चौकशी

पर्यावरण विभागाची परवानगी आवश्यक

औद्योगिक वसाहतीतील सीईटीपी प्रकल्पातून बाहेर पडणारे प्रक्रिया केलेले सांडपाणी महापालिकेच्या पिंपळगाव खांब येथील सिव्हरेज ट्रीटमेंट प्लांटच्या आउटलेट चेंबरला जोडावे. त्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या पर्यावरण विभागाचा ना हरकत दाखला घेणे बंधनकारक राहणार आहे.

औद्योगिक विकास मंडळाने सीईटीपी प्रकल्पातून बाहेर पडणारे प्रक्रियायुक्त पाण्याचा कारखान्यांसाठी, तसेच उद्यान व अन्य कामांसाठी पुनर्वापर करावा, असे अहवालात नमूद करण्यात आले आहे.

NMC Nashik News
Nashik: भ्रष्टाचाराचे आरोप अन् गैरव्‍यवहारांच्या फैरी; पुणे विद्यापीठ व्‍यवस्‍थापन परिषद बैठकीत सदस्‍य संतप्त

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com