Crime News : शेती गहाण ठेवून नोकरीसाठी दिले लाखो रुपये; भामट्याचा पर्दाफाश
Fake Appointment Letter for PWD Job Under Ministerial Quota : मंत्र्याच्या कोट्यातून सार्वजनिक बांधकाम विभागात (पीडब्ल्यूडी) उपअभियंतापदावर नोकरीचे आमिष दाखवून तब्बल ४८ लाखांना गंडा घातला. एका दुसऱ्या प्रकरणात ठाण्यातील खडकपाडा पोलिसांनी अटक केल्याने या भामट्याचे पितळ उघडे पडले.
नाशिक- बेरोजगार असलेल्या संगणक अभियंता युवकाला संशयित भामट्याने मंत्र्याच्या कोट्यातून सार्वजनिक बांधकाम विभागात (पीडब्ल्यूडी) उपअभियंतापदावर नोकरीचे आमिष दाखवून तब्बल ४८ लाखांना गंडा घातला.