Nashik News : NMCच्या कामांच्या गुणवत्तेचे नियंत्रण त्रयस्थ संस्थेकडे! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

CM Eknath Shind & Chhagan Bhujbal

Nashik News : NMCच्या कामांच्या गुणवत्तेचे नियंत्रण त्रयस्थ संस्थेकडे!

नाशिक : महापालिकेच्या माध्यमातून मागील तीन वर्षात रस्त्यांवर ४८९ कोटी रुपये खर्च झाले असून, नागरिकांच्या तक्रारी व राजकीय पक्षांच्या आंदोलनाची दखल घेत कामाची गुणवत्ता त्रयस्थ संस्थेच्या माध्यमातून केली जाणार असल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बुधवारी (ता.२१) विधानसभेत दिली. त्याचबरोबर सध्या रस्त्यांवरील खड्ड्याला महानगर गॅस लिमिटेड कंपनी, तसेच रिलायन्स कंपनीच्या माध्यमातून सुरू असलेल्या कामे जबाबदार असल्याचे स्पष्टीकरण त्यांनी दिले. (Quality control of NMC works to third party Nashik News)

राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी नाशिक शहरातील रस्त्यांच्या गुणवत्ता संदर्भात तारांकित प्रश्न उपस्थित केला होता. रस्त्यांचे गुणवत्ता राखण्याची जबाबदारी बांधकाम विभागाच्या अखत्यारीत असलेल्या गुणवत्ता व नियंत्रण विभागाचे आहे. गुणवत्ता व नियंत्रण विभागाच्या संदर्भात मोठ्या प्रमाणात तक्रारी प्राप्त झाल्याने गुणवत्ता व नियंत्रण विभागाची चौकशी केली आहे का, असा सवाल श्री. भुजबळ यांनी उपस्थित केला होता.

त्यावर उत्तर देताना मुख्यमंत्री शिंदे यांनी यापुढे महापालिकेच्या गुणवत्ता व नियंत्रण संदर्भातील कामे त्रयस्थ संस्थेमार्फत केली जाणार असल्याचे स्पष्टीकरण दिले. यावरून महापालिकेच्या गुणवत्ता व नियंत्रण विभागावर अविश्वास दर्शविण्यात आला आहे. अडीच वर्षात साडेसहाशे कोटी रुपये खर्च झाल्याचे बोलले जात असले तरी प्रत्यक्षात ४८९.७२ कोटी रुपये खर्च केल्याचे त्यांनी सांगितले.

हेही वाचा : असं एक गाव, जिथं जमिनीला कान लावला तरी संगीत ऐकू येतं...

हेही वाचा: Nandurbar Crime News : कुख्यात गुन्हेगार सुलतान, सूरजला अटक

गुणवत्ता पूर्ण कामे करण्यासाठी त्रयस्थ संस्थेमार्फत तांत्रिक लेखापरीक्षण करण्यासाठी महापालिकेच्या माध्यमातून शासकीय तंत्रनिकेतन या संस्थेची नेमणूक करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे दैनंदिन कामाचे गुणवत्ता व नियंत्रणाच्या दृष्टीने त्रयस्थ संस्था निवडणुकीची प्रक्रिया केली जाणार असल्याचे सांगितले.

एमएनजीएल, फायबरमुळे खड्डे

शहरात सद्यःस्थितीमध्ये भुयारी गटारीचे कामे सुरू आहे. पाणीपुरवठ्याची तसेच भूमिगत गॅस पाईपलाईनची कामेदेखील सुरू आहे. रिलायन्स व एअरटेल, जिओ फायबर कंपन्यांचे केबल टाकण्याचे काम सुरू असल्याने त्यासाठी रस्ते खोदकाम करावे लागते. महापालिका हद्दीत स्मार्टसिटी अंतर्गतदेखील विकासकामे सुरू असल्याचे सांगताना खासगी कंपन्यांकडून होत असलेल्या खोदकामावर रस्त्यांच्या गुणवत्तेचे खापर फोडले जात असल्याचे दिसून येत आहे.

हेही वाचा: Nashik Crime News : गावठी पिस्तूल, काडतुसांसह तिघांना अटक!