Nashik Crime News : गावठी पिस्तूल, काडतुसांसह तिघांना जोधपूरमधून अटक! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Arrested

Nashik Crime News : गावठी पिस्तूल, काडतुसांसह तिघांना अटक!

नाशिक : प्रॉपर्टी एजंटच्या सांगण्यावरून मिठाई दुकानातील कामगाराने राजस्थानातून नाशिकमध्ये गावठी पिस्तूल आणून तिसऱ्याकडे ठेवण्यासाठी दिल्याचे गुन्हे शाखा युनिट एकने केलेल्या कारवाईत समोर आले. या प्रकरणी तिघांना अटक करण्यात आली असून, एक गावठी पिस्तूल व काडतूस जप्त करण्यात आली आहेत. (Three arrested from Jodhpur with Gavathi pistol cartridges Nashik Crime News)

मुकेश फुआरामजी सोळंकी (२०, रा. कृष्णासागर मिठाई दुकान, न्युक्लअस बिल्डींग, भाभानगर), सचिन राजेंद्र अंधारे (३७, रा. गुरूकृपा बंगला, शिक्षक कॉलनी, धात्रक फाटा, पंचवटी) व मंगेश अरुण कोथमिरे (३४, रा. सूर्यवंशी चाळ, अमृतधाम, पंचवटी) अशी तिघा संशयितांची नावे आहेत. शहर गुन्हे शाखा युनिट एकचे उपनिरीक्षक विष्णू उगले, अंमलदार रवींद्र बागूल यांना मुकेश सोळंकीने गेल्या महिन्यात राजस्थानातून देशी पिस्तूल आणल्याची माहिती मिळाली होती.

त्यांनी सदर बाब वरिष्ठ निरीक्षक विजय ढमाळ यांना दिली. त्यांच्या सूचनेनुसार सापळा रचून मुकेश सोळंकी यास भाभानगर परिसरातून अटक केली. पोलिस आयुक्त अंकुश शिंदे, गुन्हे उपायुक्त प्रशांत बच्छाव यांच्या आदेशानुसार युनिट एकचे वरिष्ठ निरीक्षक विजय ढमाळ, उपनिरीक्षक विष्णू उगले, रवींद्र बागूल, प्रवीण वाघमारे, प्रदीप म्हसदे, सुरेश माळोदे, शरद सोनवणे, विशाल देवरे, चालक हवालदार नाजीम खान पठाण यांनी सदरची कामगिरी बजावली.

हेही वाचा : असं एक गाव, जिथं जमिनीला कान लावला तरी संगीत ऐकू येतं...

हेही वाचा: Nashik News : बिलांचे ठराविक ठेकदारांनाच वाटप; इंजिनिअर्स असोसिएशनची अधीक्षक अभियंत्यांकडे तक्रार

अंधारेने मागविले पिस्तूल

चौकशीमध्ये मुकेश याने जोधपूर येथून गावठी पिस्तूल व १ जिवंत काडतूस प्रॉपर्टी एजंट सचिन अंधारे यांच्या सांगण्यावरून आणल्याचे समोर आले आहे. पथकाने त्याला पिस्तूल व काडतुसबाबत विचारपूस केली असता त्याने पिस्तूल त्याचा मित्र मंगेश कोथमिरे याच्याकडे ठेवण्याचे सांगितले. त्यास अटक केली असता, त्याने पिस्तूल घरात लपवून ठेवल्याचे सांगितले. कारवाईत ३५ हजारांचे पिस्तूल व ५०० रुपयांचे जिवंत काडतूस जप्त करण्यात आले आहे.

हेही वाचा: Sammed Shikhar Pilgrimage Case : झारखंड सरकारचा जैन धर्मियांकडून निषेध