ह्रदयद्रावक! कोरोना नसलेल्या ज्‍येष्ठ दांपत्याला केले क्वारंटाइन..सांगितली धक्कादायक आपबिती...एकदा पाहाच

KORONA-00.jpg
KORONA-00.jpg
Updated on

नाशिक : त्र्यंबकेश्‍वर-जव्हार रोडवर राहणारे व मोखाडा येथे मसाल्याचा व्यवसाय करणारे सुभाष देशपांडे यांची ही व्यथा आहे. कोरोना नसताना क्वारंटाइन केल्यामुळे आलेल्या अनुभवाची आपबीती सांगताना या दापंत्याने अतिशय वाईट अनुभव आल्याचे सांगितले. पाहा व्हिडिओ...

ज्येष्ठ दाम्पत्यांची धक्कादायक आपबिती

त्र्यंबकेश्‍वर-जव्हार रोडवर राहणारे व मोखाडा येथे मसाल्याचा व्यवसाय करणारे सुभाष देशपांडे यांची ही व्यथा आहे. कोरोना नसताना क्वारंटाइन केल्यामुळे आलेल्या अनुभवाची आपबीती सांगताना या दांपत्याने अतिशय वाईट अनुभव आल्याचे सांगितले. देशपांडे यांच्या पत्नीस मधुमेहाचा त्रास होत असल्याने त्यांनी पहिल्याच लॉकडाउनमध्ये नाशिकच्या जिल्हा रुग्णालयात आणि त्यानंतर जूनमध्ये व मुंबईला के.ई.एम. रुग्णालयात उपचार घेतले. त्यानंतर हे दांपत्य त्र्यंबकेश्वर येथे पोचल्यावर येथील त्र्यंबकेश्‍वर पालिकेच्या कर्मचाऱ्यांना लॉकडाउनच्या नियमानुसार, या दांपत्याने सगळी कागदपत्रे व तपासण्यांची फाइल दाखविली. त्यानुसार त्यांना पुन्हा येथील कर्मचाऱ्यांनी वैद्यकीय तपासणीला त्र्यंबकेश्‍वरच्या उपजिल्हा रुग्णालयात पाठविले. तेथील वैद्यकीय तपासणीत दांपत्याला कोरोनाची कोणतीही लक्षणे नसताना बसस्थानकालगतच्या अमृतकुंभ अतिथी निवासात क्वारंटाइन केले. 

अंगावरील दागिने विकून काढताएत दिवस
त्र्यंबकेश्‍वरला ज्या ‘अमृतकुंभ’ इमारतीत या दांपत्याला क्वारंटाइन करण्यात आले. तेथे कुठल्याही सुविधा नव्हत्या. ना बिछाना ना चहापाणी आणि भोजनव्यवस्था नसलेल्या क्वारंटाईन केंद्रात १४ दिवस काढताना जवळचे पैसे उपचारात संपलेले असल्याने व कोणी लक्ष देईना. त्यामुळे देशपांडे यांना त्यांच्या अंगावरील दागिने विकून क्वारंटाइन केंद्रात दिवस काढावे लागले. दागिने विक्रीचे पैसे संपल्यावर त्यांनी पालिका कर्मचाऱ्यांना विनविले असता रविवारी अन्नक्षेत्रातून जेवून यायला सांगितले.विशेष म्हणजे या दांपत्याने दोन दिवस अन्नछत्रातील जेवणावर काढले. 

अधिकारी अनभिज्ञ 
वयोवृद्ध ज्येष्ठ दांपत्याच्या व्यथेविषयी पालिकेच्या अधिकारी अनभिज्ञ असल्याचे पुढे आले. घडल्या प्रकाराबाबत पालिकेच्या अधिकाऱ्याशी संपर्क साधला असता, वरिष्ठांनी कानावार हात ठेवले, तर ज्यांच्यावर जबाबदारी होती त्यांनी त्या दांपत्याचा मोबाईलच लागत नसल्याचे उत्तर दिले.

धक्कादायक प्रकार

कोरोना झालेला नसलेल्या परंतु क्वारंटाइन केलेल्या ज्येष्ठ दाम्पत्याला जेवणासाठी अंगावरचे दागिने विकावे लागले. दागिने विक्रीचे पैसे संपल्यानंतरही क्वारंटाईन केंद्रात जेवणाची सोय नसल्याने अखेर यंत्रणेने या दाम्पत्याला जेवणासाठी चक्क अन्नछत्रात पाठविल्याचा धक्कादायक प्रकार त्र्यंबकेश्वरला उघडकीस आला. 

रिपोर्टर - कमलाकर अकोलकर

(संपादन - ज्योती देवरे)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

The former Zilla Parishad school student has become an inspiration for rural and tribal students across Maharashtra.
Revenue department corruption Maharashtra
Farmhouse Hideout Ends in Arrest Nashik Police Tighten Probe Into Rs 160 Crore Shalarth Scam Case
Dilip Gavit inspirational success story
Marathi News Esakal
www.esakal.com