BREAKING : VIDEO : "जीव घुसमटतोय आमचा इथे"..क्वारंटाइन्स सांगताएत धक्कादायक आपबिती..एकदा बघाच..

samajkalyan 3.jpg
samajkalyan 3.jpg

नाशिक / डीजीपी नगर : कोरोनाच्या कहरने जगाला हैराण केले असून गेल्या अडीच ते तीन महिन्यापासून लॉकडाऊन आणि कोरोनाच्या दहशतीने आणि भीतीने सर्वसामान्य जनतेला जगणे मुश्कील झाले आहे, शासनाच्या अधिसूचनेप्रमाणे यात ज्या ठिकाणी रुग्ण सापडतात त्या ठिकाणचा आणि लगतचा परिसर प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित केला जातो आणि रुग्णाच्या संपर्कात आलेल्यांना तात्काळ क्वारंटाइन केले जाते. पण त्यानंतर त्यांच्या आरोग्याची जी हेळसांड होते किंवा त्या ठिकाणी केला जाणारा निष्काळजापणा यासाठी बेजबाबदारपणा का केला जातोय..याबाबत खुद्द क्वारंटाईन केलेल्या नागरिकांनीच धक्कादायक खुलासा केला आहे.

काय घडले नेमके?

सातपूर परिसरातील आनंदछाया येथे काल रुग्ण आढळून आल्याने त्याच्या संपर्कातील ११ लोकांना नाशिक पुणे रोड वरील विभागीय समाजकल्याण कार्यालयाच्या क्वारंटाइन केंद्रावर क्वारंटाइन करण्यात आले. मात्र ज्या ठिकाणी या संशयित रुग्णांना दाखल करण्यात आले. त्या वार्डमध्ये पलंग कॉट मोडकळीस आलेले असून अत्यंत वाईट सुविधा निदर्शनास आल्या. इथे अस्वच्छता तसेच लाईट पाण्याची सोय नसून, आमची तब्बेत चांगली आहे पण समाजकल्याणच्या अस्वच्छता क्वारंटाइन केंद्रामुळे निश्चितपणे आम्ही अधिक प्रमाणात आजारी होऊन आमच्या जीविताला धोका निर्माण होईल असे येथे क्वारंटाइन झालेले कासिर इनामदार यांनी सकाळशी बोलतांना सांगितले.

गलथान कारभाराचे वाभाडे

५ जिल्ह्याचे विभागीय समाजकल्याण कार्यालय असलेल्या  याच कॅम्पस  मध्ये  वसतिगृह असून लॉकडाऊन वस्तीगृह बंद असल्याने व येथील खोल्यांच्या अवस्थेवरून समाजकल्याण विभागाच्या गलथान कारभाराचे वाभाडे ही निघत आहेत 

दूषित वातावरणाने लोकांना अधिक बाधा​

कोरोना रुग्णांपासून बाधित लोकांना येथे क्वारंटाइन केले जात असून येथील ऍडमिट केलेल्या लोकांना कोणी वाली नसल्याचे येथील रुग्ण बोलत दाखवत असून वेळेवर पाणी जेवण ही मिळत नसल्याने दुर्दैवाने जर या लोकांत कोणी कोरोना ग्रस्त आढळून आला तर त्याच जीवाचं काय होणार इतरांचं पुढे काय होणार या भीतीने आणि येथील दूषित वातावरणाने लोकांना अधिक बाधा होवू शकते असा प्रश्न उपस्थित झाला असून तात्काळ प्रशासनाने दखल घेऊन उपाय योजना करावी अशी मागणी येथील क्वारंटाइन कासिर इनामदार ,संदेश मांगडे,पोपट सावंत,कुणाल महाजन,छाया महाजन,समीना इनामदार यांनी केली आहे.

आमच्या जीविताला धोका निर्माण

दुदैवाने आमच्या शेजारी कोरोनाचा रुग्ण आढळून आला यांच्यात आमचा काय दोष पण ज्याठिकाणी आम्हाला ठेवण्यात आले तेथील भयानक परिस्थिती बघून आमचे मनोधैर्य आणि प्रतिकारशक्ती कशी टिकून त्या ऐवजी दुसऱ्याच आजाराने आणि येतील वातावरणाने आमच्या जीविताला धोका निर्माण झाला आहे.- कासिर इनामदार, क्वारंटाइन संशयित रुग्ण.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com