esakal | लस घेण्यासाठी नाशिकमध्ये पहाटे पाचपासून रांगा; नागरिकांची सुरक्षितता मात्र वाऱ्यावर
sakal

बोलून बातमी शोधा

Nashik Vaccination

लस घेण्यासाठी नाशिकमध्ये पहाटे पाचपासून रांगा

sakal_logo
By
प्रमोद दंडगव्हाळ

सिडको (नाशिक) : सिडको महापालिका विभागीय कार्यालय व वैद्यकीय विभागाच्या नियोजनशून्य कारभारामुळे येथील लसीकरण केंद्रावर येणाऱ्या-जाणाऱ्या नागरिकांची सुरक्षितता पूर्णतः वाऱ्यावर सोडल्याचे विदारक चित्र बघायला मिळत आहे. या प्रकाराकडे विभागीय अधिकारी व वैद्यकीय अधिकाऱ्यांचे लक्ष जाऊ नये, याबाबत नागरिकांमध्ये आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. येथे लस घेण्यासाठी नागरिक सकाळी पाचपासून लांबच लांब रांगा लावतात. (Queues in Nashik from 5 am for vaccination)

सामाजिक अंतर नियमाचा फज्जा

लसीकरण (Vaccination) केंद्राबाहेर नागरिकांनी रांगा लावताना सामाजिक अंतर ठेवले आहे किंवा नाही, हे पाहण्याचे काम महापालिका कर्मचाऱ्यांचे आहे. परंतु या ठिकाणी एकही महापालिका कर्मचारी नियोजनासाठी दिसून येत नाही. सद्यःस्थितीमध्ये महापालिका अधिकारी व कर्मचारी स्वतःला सुरक्षित ठेवण्यात व्यस्त असल्याचे दिसून येत आहे. नागरिकांच्या सुरक्षिततेची त्यांना कुठल्याही प्रकारची चिंता वाटत नसल्याचे चित्र सध्या तरी दिसून येत आहे. लस घेण्यासाठी नागरिक सकाळी पाचपासून लांबच लांब रांगा लावतात. लसीकरण केंद्रावर कोणत्याही प्रकारे नियोजन नसल्याने सामाजिक अंतर नियमाचा फज्जा उडाल्याचे पाहायला मिळाले.

याबाबत सिडको महापालिका विभागीय अधिकारी डॉ. मयूर पाटील व वैद्यकीय अधिकारी डॉ. नवीन बाजी यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. सिडको येथील स्वामी समर्थ रुग्णालय, कामटवाडे येथील पंडित दीनदयाळ उपाध्याय केंद्र, महालक्ष्मीनगर येथील समाजमंदिर, जुने सिडको येथील अचानक चौक रुग्णालय, हेडगेवारनगर, चिंचोळा, पिंपळगाव खांब या ठिकाणी महापालिकेतर्फे नागरिकांसाठी लसीकरण केंद्रे आहेत.

हेही वाचा: नाशिक-औरंगाबाद सीमेवर पोलिसांकडूनच ई-पासची तपासणी; आरोग्य तपासणी नाहीच

loading image
go to top