Agriculture
sakal
येवला: नाशिक जिल्ह्याचा इतिहास आहे की, खरीपात चांगला पाऊस झाल्यास रब्बी हंगाम बहरतो. यावर्षी जरी अतिवृष्टीमुळे खरीप पिकांचे प्रचंड नुकसान झाले असले, तरी याच पाण्यामुळे रब्बीचा मोठा आशावाद निर्माण झाला आहे. पाण्याची मुबलक उपलब्धता असल्याने जिल्ह्याच्या सर्वच भागांत रब्बीचे क्षेत्र वाढणार आहे. यात उन्हाळ कांदा, गहू, रब्बी मका आणि हरभरा यांच्या क्षेत्रात लक्षणीय वाढ होताना दिसेल.