Rabi season Crop Competition 2023: पीक स्पर्धेसाठी 31 डिसेंबरपर्यंत मुदत

Wheat Crop
Wheat Cropesakal

नाशिक : कृषी विभागामार्फत रब्बी हंगाम २०२३ पीक स्पर्धेसाठी शेतकऱ्यांना ३१ डिसेंबरपर्यंत सहभागी होता येणार असल्याचे कृषी संचालक (विस्तार व प्रशिक्षण) दिलीप झेंडे यांनी कळविले आहे.

या स्पर्धा तालुका, जिल्हा व राज्यपातळीवर राबविण्यात येणार आहेत. त्यानुसार सर्वसाधारण व आदिवासी गटासाठी ज्वारी, गहू, हरभरा, करडई व जवस या पाच पिकांसाठी ही स्पर्धा होणार आहे. (Rabi season Crop Competition 2023 Deadline till 31st December nashik)

या स्पर्धेत सहभागासाठी शेतकऱ्याकडे स्वत:च्या नावे जमीन असणे व ती जमीन तो स्वत: कसत असणे आवश्यक आहे. शेतकऱ्यांना एकाचवेळी एकापेक्षा जास्त पिकांसाठी स्पर्धेत सहभागी होता येईल.

पीक स्पर्धेत सहभागी होणाऱ्या शेतकऱ्याची स्वत:च्या शेतावर त्या पिकाखाली किमान ४० आर. क्षेत्रावर सलग लागवड असणे आवश्यक आहे. पीकनिहाय सर्वसाधारण गटासाठी स्पर्धा प्रवेशशुल्क रक्कम ३००, तर आदिवासी गटासाठी प्रवेशशुल्क रक्कम १५० रुपये आहे.

Wheat Crop
Nashik Unseasonal Rain Damage: नाशिक पूर्व भागात पिकांचे पंचनामे अपूर्णच! शासकीय यंत्रणा उदासीन; शेतकऱ्यांचा आरोप

तालुका पातळीवर निवड झालेल्या स्पर्धकाला पाच, द्वितीय क्रमांकास तीन व तृतीय क्रमांकास दोन हजारांचे बक्षीस देण्यात येणार आहे.

जिल्हा व राज्य पातळीवरील स्पर्धांची रक्कम यापेक्षा अधिक आहे. अधिक माहितीसाठी शेतकऱ्यांनी तालुका कृषी अधिकारी कार्यालयात संपर्क साधण्याचे आवाहन कृषी विभागाने केले आहे.

Wheat Crop
Crop Insurance: जिल्हाधिकाऱ्यांचे पीक विम्याच्या आगाऊ रकमेचे आदेश कायम; 25 टक्के भरपाईचा मार्ग मोकळा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com