Rajiv Gandhi Administrative Dynamism (Progress) Campaign and Competition is conducted every year to bring dynamism in administration.
Rajiv Gandhi Administrative Dynamism (Progress) Campaign and Competition is conducted every year to bring dynamism in administration.esakal

Nashik News : मुख्यमंत्री अन उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते राधाकृष्ण गमेंनी स्वीकारले पारितोषिक!

Nashik News : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज मुंबईतील सह्याद्री अतिथिगृहात नागरी सेवा दिनानिमित्त झालेल्या कार्यक्रमात राजीव गांधी प्रशासकीय गतिमानता अभियानातील राज्यातील प्रथम क्रमांकाचा नाशिक विभागाचा पुरस्कार विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी स्वीकारला.

महसूल उपायुक्त रमेश काळे यांच्यासह इतर अधिकारी उपस्थित होते. (Radhakrishna Game accepted award from Chief Minister and Deputy Chief Minister Nashik News)

राज्यातील सर्व मुख्यालयाच्या कार्यालयातून थेट येणाऱ्या प्रस्तावात नाशिक विभागीय आयुक्त कार्यालयास कार्यालयीन व्यवस्थापनामध्ये आधुनिक संकल्पना व व्यवस्थापन पध्दतीचा अवलंब केल्याबद्दल प्रथम क्रमांकाच्या दहा लाख रुपयांच्या पारितोषिकाने श्री. गमे यांचा गौरव करण्यात आला आहे.

महिला व बालविकास मंत्री मंगलप्रभात लोढा, मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव, अपर मुख्य सचिव सुजाता सौनिक आदी उपस्थित होते.

जळगाव आणि धुळ्याची बाजी

प्रशासनात गतिमानता आणण्यासाठी राजीव गांधी प्रशासकीय गतिमानता (प्रगती) अभियान व स्पर्धा हे अभियान दरवर्षी राबवण्यात येते. अभियानातंर्गत तालुका, जिल्हा, विभाग व राज्यस्तरावरील स्पर्धेत सर्वोत्तम कामगिरी केलेली कार्यालये व सर्वोत्कृष्ट कल्पना-उपक्रम सुचविणाऱ्या सरकारी संस्था, अधिकारी व कर्मचारी यांना पारितोषिके देण्यात येतात.

जळगाव जिल्हाधिकाऱ्यांनी संजय गांधी निराधार योजनेचे अनुदान घरपोच वाटप केल्याबद्दल त्यांना दहा लाख रुपयांचे पहिल्या क्रमांकाचे पारितोषिक प्रदान करण्यात आले.

त्याचप्रमाणे सर्वोत्कृष्ट उपक्रमात धुळे जिल्हाधिकारी कार्यालयाने भूसंपादन प्रक्रियेत नागपूरच्या महाराष्ट्र रिमोट सेन्सिंग ॲप्लिकेशन सेंटरकडून प्राप्त उपग्रह छायाचित्रांचा वापर करण्यात प्रथम क्रमांक मिळवून ५० हजार रुपयांचे पारितोषिक मिळवले.

हेही वाचा : संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार

Rajiv Gandhi Administrative Dynamism (Progress) Campaign and Competition is conducted every year to bring dynamism in administration.
NMC Water Reduction : पाणीकपात नेमकी कोणासाठी? राजकारण पेटले; औरंगाबादसाठी पाणीकपात करण्याचा संशय

अधिकारी-कर्मचारी पारितोषिक विजेते

० सर्वोत्कृष्ट अधिकारी-प्रथम-एरंडोल नगरपालिकेचे मुख्याधिकारी विकास नवाळे (बचतगटांना फळझाड प्रकल्पाच्या माध्यमातून स्वयंरोजगाराचे साधन उपलब्ध करून दिले)

० द्वितीय-कर्जतचे तालुका कृषी अधिकारी पद्मनाभ शिवाजी म्हस्के (कृषी विभागाच्या विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी महाडीबीटी मेळाव्याच्या माध्यमातून केली)

० सर्वोत्कृष्ट कर्मचारी-प्रथम-राहतामधील मंडलाधिकारी डॉ. मोहसीन युसूफ शेख (महसूल अर्धन्यायिक निकालपत्रात क्यूआर कोडचा राज्यातील प्रथम नावीन्यपूर्ण प्रयोग केला)

० द्वितीय- पाथर्डीचे तलाठी राजू मोहन मेरड मंडलाधिकारी वैशाली सदाशिव दळवी (आदिवासी समाजासाठी आधारकार्ड, रेशनकार्ड, बॅंक पुस्तिका आदी दिले)

Rajiv Gandhi Administrative Dynamism (Progress) Campaign and Competition is conducted every year to bring dynamism in administration.
NMC Water Scarcity Plan: 30 पाण्याचे टँकर, 100 बोअरवेल खोदणार! पाणीटंचाई कृती आराखडा विभागीय आयुक्तांना सादर

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com