Radhakrishna Game: शहराच्या विकासासाठी आत्मपरीक्षण करण्याची गरज

Inaugurating Naredco Homethon Exhibition, Divisional Commissioner Radhakrishna Game and others
Inaugurating Naredco Homethon Exhibition, Divisional Commissioner Radhakrishna Game and othersesakal

Radhakrishna Game : नाशिकची बरोबरी पुण्याबरोबर केली जाते. मात्र, पुणे वेगाने पुढे जात आहे. पुण्याआधी नाशिकच्या ‘एक्स्प्रेस वे’चे सर्वेक्षण झाले होते, तरी तो रखडला.

आपल्या शहराच्या विकासात आपणच अडथळे ठरतो. आता हे अडथळे कसे दूर करता येतील, यासाठी आत्मपरीक्षण करावे लागेल, असे प्रतिपादन विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी केले. (Radhakrishna Game statement about city development nashik news)

नॅशनल रिअल इस्टेट डेव्हलपमेंट कौन्सिल (नरेडको)तर्फे आयोजित ‘होमेथॉन २०२३’ प्रॉपर्टी एक्स्पोच्या उद्‌घाटनाप्रसंगी ते बोलत होते. गमे म्हणाले, की नाशिकच्या विकासाबाबत इतरांना दोष देण्यात काही कारण नाही. सत्य परिस्थिती आपण जाणतो. या प्रॉपर्टी एक्स्पोचा नागरिकांना लाभ होईलच, मात्र यातून शहराचा विकासही साधला जाईल.

मात्र, केवळ घर बांधून होणार नाही. शहरातील नागरिकांसाठी रोजगार, जीवनावश्यक सर्वच बाबींचा विकासही झाला पाहिजे. मंत्रभूमी, यंत्रभूमी आणि आता वेलनेस कॅपिटल शहर पुढचा टप्पा गाठत आहे. रियल इस्टेटमध्ये काम करणाऱ्या प्रत्येकाने ग्रीन डेव्हलपमेंटचाही विचार करायला हवा. नागरिकांनी घर खरेदी करताना बांधकाम व्यावसायिकाकडेच इ-रजिस्ट्रेशन करावे.

ज्यांचे कामासंदर्भात मुद्दे प्रलंबित असतील, ते शासन स्तरावर सोडविण्याचा नक्की प्रयत्न करणार. यासह सातबारा फेरफार नोंदींसाठी इ- हक्क प्रणालीसारख्या ऑनलाइन सुविधेचा लाभ घ्यावा. येत्या कुंभमेळ्याच्या नियोजनात नागरिकांनी सहभाग घ्यावा, असे आवाहन त्यांनी या वेळी केले. नाशिकमधील सहा तालुक्यांतील दोन हजार ७०० स्क्वेअर किलोमीटरचा भूभाग हा ‘एनएमआरडीए’मध्ये आहे. टाउन प्लॅनिंग स्कीममधून याचा विकास साधता येऊ शकतो, असे प्रतिपादन ‘एनएमआरडीए’ आयुक्त सतीश खडके यांनी केले.

Inaugurating Naredco Homethon Exhibition, Divisional Commissioner Radhakrishna Game and others
Property Tax : पुढील आर्थिक वर्षात मिळकतकरात वाढ नाही

महापालिका आयुक्त डॉ. अशोक करंजकर, पोलिस आयुक्त संदीप कर्णिक, सहनिबंधक कैलास दवंगे, ‘मविप्र’ सरचिटणीस अॅड. नितीन ठाकरे, शिमला विभागीय आयुक्त संदीप कदम यांनी मनोगत व्यक्त केले. अध्यक्ष अभय ताथेड, दीपक बिल्डर्सचे दीपक चंदे, ललित रुंग्ठा ग्रुपचे ललित रुंग्ठा, सचिव सुनील गवांदे, सहसमन्वयक शंतनू देशपांडे, भूषण महाजन, हितेश ठक्कर आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते. दीपक चंदे प्रदर्शनाचे मुख्य प्रायोजक आहेत. पॉवर्ड बाय ललित रुंग्ठा ग्रुप बिल्डर्स अॅन्ड डेव्हलपर्स आहेत.

‘होमेथॉन’चे मुख्य समन्वयक जयेश ठक्कर यांनी प्रास्ताविक केले. नंदन दीक्षित यांनी सूत्रसंचालन केले. नागरिकांना २५ डिसेंबरपर्यंत डोंगरे वसतिगृह मैदानावर प्रदर्शनाचा लाभ घेता येणार आहे. प्रदर्शनात प्रवेश विनामूल्य असून, प्रवेश करण्यापूर्वी नागरिकांना क्यूआर कोडद्वारे रजिस्ट्रेशन करावे लागेल.

प्रदर्शनात १५ लाख ते १२ कोटींपर्यंतची घरे

या प्रदर्शनात नाशिकसह मुंबई, पुणे यासह विदर्भातील नामांकित बांधकाम व्यावसायिकांनी सहभाग घेतला आहे. स्वतःचे हक्काचे घर घेऊ इच्छिणाऱ्या प्रत्येकासाठी हा एक्स्पो पर्वणी ठरेल. यात अल्प, मध्यम उत्पन्न असणाऱ्या नागरिकांना केंद्रबिंदू ठेवण्यात आले आहे. प्रदर्शनात १५ लाखांपासून १२ कोटी रुपयांपर्यंतची घरे नागरिकांना खरेदी करता येतील. प्रदर्शनात घराची बुकिंग करणाऱ्या ग्राहकांना ‘नरेडको’तर्फे चांदीचे नाणे भेट देण्यात आले.

Inaugurating Naredco Homethon Exhibition, Divisional Commissioner Radhakrishna Game and others
Sudhakar Badgujar: सुधाकर बडगुजर आज एसीबीला जाणार सामोरे 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com