Accidents
sakal
चांदवड: मुंबई– आग्रा महामार्गावरील राहूड घाट हा अतिशय उताराचा, वळणावळणाचा असल्याने येथे अपघातांची मालिका सुरूच असते. दर दोन-तीन दिवसांत मोठ्या अपघातामुळे वाहतूक कोंडी होण्याच्या घटना घडत असल्याने वाहनचालकांसमोर सतत धोका निर्माण होत आहे. नुकत्याच झालेल्या भारत पेट्रोलियमच्या एलपीजी टँकर उलटण्याच्या अपघाताने या समस्येचे गांभीर्य पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे.