Uddhav Nimse
sakal
नाशिक: राहुल धोत्रे याच्या खून प्रकरणातील संशयित व भारतीय जनता पक्षाचा माजी नगरसेवक उद्धव निमसे यास न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावली. त्यामुळे त्याची नाशिक रोड मध्यवर्ती कारागृहात रवानगी करण्यात आली आहे. दरम्यान, निमसे याच्याकडून जामिनासाठी अर्ज केल्याचे समजते. याच गुन्ह्यातील संशयित सचिन दिंडे शुक्रवारी (ता. १९) जिल्हा न्यायालयात हजर झाला. त्याला न्यायालयाने मंगळवार (ता. २३)पर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.