नाशिक: महापालिका शाळा क्रमांक ५१ सिन्नर फाटा येथील शिक्षक राहुल कोळी यांनी शेतकऱ्यांच्या जीवनावर आधारित ‘जगाचा पोशिंदा’ या चित्रसंग्रहाची निर्मिती केली असून, त्याचे प्रकाशन नुकतेच प्रगतिशील शेतकरी तानाजी अरिंगळे व विनायक अरिंगळे, तसेच राजाभाऊ वावधाने यांच्या हस्ते झाले. या वेळी केंद्रप्रमुख वाल्मीक पवार, चंद्रकांत गायकवाड, सुनील बोंडे, निर्मला दिवटे, राजेंद्र परदेशी तसेच विद्यार्थी उपस्थित होते.