Crime
sakal
पंचवटी: पेठ रोडवरील राहुलवाडी येथे सागर जाधव याच्यावर गोळीबार करणाऱ्या ११ संशयितांना जेरबंद करण्यात पोलिसांना यश आले आहे. पंचवटी, भद्रकाली गुन्हे शोध पथक व गुंडाविरोधी पथकाने संयुक्तपणे ही कारवाई केली. प्रत्यक्ष गोळीबार करणारे विकी उत्तम वाघ व विकास ऊर्फ विकी विनोद वाघ, अमोल पारे ऊर्फ बबल्या तसेच साथीदारांचा माग काढला जात आहे. शुक्रवारी (ता.१९) दुपारी पोलिस उपायुक्त किशोर काळे यांनी पंचवटी पोलिस ठाण्यात झालेल्या पत्रकार परिषदेत माहिती दिली.