Nashik Crime: मालेगावला गुटखा विक्रेत्यांवर छापे; तिघांना अटक

Crime News
Crime Newsesakal

Nashik Crime : शहर व परिसरात पोलिसांनी टाकलेल्या तीन वेगवेगळ्या छाप्यात ५२ हजाराचा गुटखा जप्त करण्यात आला. या प्रकरणी तिघा संशयितांना अटक करण्यात आली आहे. दोघे जण फरार असून पोलिस त्यांचा शोध घेत आहेत.

जिल्हा पोलिस अधिक्षक शहाजी उमाप यांनी जिल्ह्यात अवैधरीत्या गुटखा विक्री करणाऱ्यांविरुद्ध मोहीम सुरु केली आहे. या मोहिमेमुळे अवैधरीत्या गुटखा विक्री करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहे. (Raids on gutkha sellers in Malegaon Three arrested Nashik Crime)

शहरातील जुना मुंबई-आग्रा महामार्गावरील मोतीबाग नाक्याजवळ प्रशांत मधुकर वाघ (वय ४६, रा. देवी मंदिर, संगमेश्‍वर) यांच्या दुकानावर पोलिसांनी छापा टाकून ४३ हजार २८६ रुपयांचा ऐवज जप्त केला. श्री. वाघ यांच्या ताब्यातून तंबाखू, पान मसाला, मोबाईल, दुचाकी (एमएच ४१ एएच ७९०९) असा एकूण ४३ हजार २८६ रुपयांचा ऐवज जप्त केला.

प्रशांतला छावणी पोलिसांनी अटक केली आहे. शहरातील सनी किराणा दुकानावर शहर पोलिसांनी दुसरा छापा टाकला. सर्वे नं. ५५ मधील सलमान गुलाब शहा (वय ३०) व अमजद टोपी (रा. गौतम नगर) यांच्या सनी किराणा दुकानावर छापा टाकून पोलिसांनी सुमारे तीन हजाराचा गुटखा जप्त केला.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Crime News
Credit Card Bill: क्रेडिट कार्ड ड्यु डेट निघून गेली? काळजी करू नका, 'हा' पर्याय वापरून सहज टाळा दंड

शहर पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दोघांना अटक केली आहे.

तालुक्यातील निमगाव येथूनही १५ हजार रुपये किमतीचा अवैध गुटखा जप्त जप्त करण्यात आला. निमगाव (ता. मालेगाव) येथील भागचंद पूनमचंद लोढा (वय ४८) व निलिन यशोधरा (रा. शेवाळे नगर) या दोघांकडून एकूण १५ हजार ३०७ रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला. दोघांविरुद्ध तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Crime News
Pune Crime News : Darshana Pawar हिचे शेवटचे बोल काय होते?

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com