Nashik Road Protest : नाशिक रोडला आंदोलनाचा पवित्रा! गिरीश महाजनांच्या अटकेसाठी 'संविधान आर्मी'चा एल्गार

Rail Roko Protest Called at Nashik Road : नाशिक रोड येथे ऑल इंडिया संविधान आर्मीच्या वतीने रेल रोको आंदोलनाची हाक देण्यात आली होती; कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी मोठा पोलिस व आरपीएफ बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
Protest

Protest

sakal

Updated on

Nashik Politics : ऑल इंडिया संविधान आर्मीच्या वतीने कॅबिनेट मंत्री तथा कुंभमंत्री गिरीश महाजन यांच्या विरोधात सोमवारी (ता. ९) नाशिक रोड येथे रेल रोको आंदोलनाची हाक देण्यात आली होती. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव भाषणात न घेतल्याप्रकरणी गिरीश महाजन यांच्यावर ॲट्रॉसिटी ॲक्टनुसार कारवाई करून अटक करावी, मुख्यमंत्री यांनी त्यांचा राजीनामा घ्यावा तसेच माधवी जाधव यांना पोलिस संरक्षण द्यावे, या प्रमुख मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com