Nashik News: इगतपुरीतील रेल्वे हॉस्पिटलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांना सुविधा मिळणार! मजदूर संघाच्या आंदोलनाला यश

शहरातील मध्य रेल्वे हॉस्पिटलच्या विविध समस्यासंदर्भात सेंट्रल रेल्वे मजदूर संघाने रेल्वे हॉस्पिटलच्या प्रांगणात धरणे आंदोलनाचा इशारा दिला होता.
Officials in discussion with office bearers of Central Railway Mazdoor Sangh
Officials in discussion with office bearers of Central Railway Mazdoor Sanghesakal

इगतपुरी शहर : शहरातील मध्य रेल्वे हॉस्पिटलच्या विविध समस्यासंदर्भात सेंट्रल रेल्वे मजदूर संघाने रेल्वे हॉस्पिटलच्या प्रांगणात धरणे आंदोलनाचा इशारा दिला होता.

मात्र, रेल्वे प्रशासनाने धरणे आंदोलन करू नये, आपण बैठकीत चर्चेद्वारे मार्ग काढू, असे सांगितले. त्यामुळे धरणे आंदोलन स्थगित करण्यात आले. (Railway employees will get facilities in the railway hospital in Igatpuri Mazdoor Sangh movement success Nashik News)

कल्याण येथे सेंट्रल रेल्वे मजदूर संघ, मुंबई शाखेचे चेअरमन एस. के. ठाकूर, सेक्रेटरी विवेक सिसोदिया, अनिल दुबे, राकेश श्रीवास्तव, सेंट्रल रेल्वे मजदूर संघाचे सेक्रेटरी अतुल गोईकणे यांच्या नेतृत्वाखाली बैठक झाली. बैठकीत रेल्वे हॉस्पिटलमध्ये कोणत्याही कर्मचाऱ्यास पुणे येथे पाठविले जाणार नाही,

तसेच रिक्त पदांची तत्काळ भरती केली जाईल, अतिदक्षता विभागासाठी जागा निश्चित करून तज्ज्ञ डॉक्टरांची नियुक्ती केली जाईल.

ते सप्ताहातून बुधवारी उपलब्ध राहतील, रेल्वे दवाखान्यात मुबलक प्रमाणात औषधांचा साठा उपलब्ध केला जाईल, रेल्वे हॉस्पिटलच्या मुख्य इमारतीचे निरीक्षण आणि विकास केला जाईल, बैठकीसाठी हॉल सुरू केला जाईल, सोनोग्राफी मशीन उपलब्ध होईपर्यंत खासगी सोनोग्राफी सेंटरद्वारे सोनोग्राफीची सुविधा उपलब्ध करून दिली जाईल, तसेच १० पुरुष आणि १० महिलांसाठी स्वतंत्र वॉर्ड निर्माण करून दिले जाईल, असे बैठकीत ठरले.

Officials in discussion with office bearers of Central Railway Mazdoor Sangh
Sanjay Raut : यापूर्वी छापे पडले, त्याचे काय झाले? नाशिकच्या छापेसत्रावरून राऊत यांचा केंद्राला टोला

रेल्वे प्रशासनाच्या अधिकाऱ्यांसोबत झालेल्या बैठकीस देविदास गायकवाड, मनोज पवार, संतोष कुमार, भगीरथ मीना, मनोहर आडोळे, तुकेश चव्हाण, बबन काशिनाथ कडू, राहुल जाधव, आकाश फलटणकर, बसंत सैन, गौतम शिंदे, नीलेश भागडे, नितीन कडू, विलास भागडे, भगवान सोनवणे, कैलास वाघ आदी उपस्थित होते.

तालुक्यातील रेल्वे कर्मचाऱ्यांना औषधोपचार घेण्यासाठी कल्याण किंवा नाशिकला जावे लागत होते. मात्र, आता इगतपुरीत पुन्हा रेल्वे हॉस्पिटलमध्ये सर्व सुविधा मिळणार असल्याने रेल्वे कर्मचाऱ्यांनी आनंद व्यक्त केला आहे.

Officials in discussion with office bearers of Central Railway Mazdoor Sangh
Nashik Krushi Mahotsav : नाशिकमध्ये 10 फेब्रुवारीपासून कृषी महोत्सव! पाच दिवसीय महोत्सवात दोनशेपेक्षा अधिक स्टॉल

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com