
5 महिन्यांपूर्वी गुन्हे करून पळून गेलेल्या आरोपीस अटक
नाशिक रोड (नाशिक) : रेल्वे स्थानकांवर पाच महिन्यापूर्वी गुन्हा करून फरारी झालेल्या संशयितास रेल्वे पोलिसांनी जेरबंद केले. रेल्वे स्थानकांवर फलाट एकवर मिश्रा यांचे रेल्वे कॅन्टीन आहे. कॅन्टीनवर बिस्कीट व केक विक्रीचे काम करीत असताना ३ जानेवारीला त्यांचे लक्ष विचलीत करून दोघांनी मोबाईल व माल चोरून नेला होता. याबाबात नाशिक रोड रेल्वे स्थानक पोलिस स्टेशनला गुन्हा नोंदविण्यात आला होता.
हेही वाचा: संतापजनक! कंत्राटी कर्मचारी महिलेकडे शरीर सुखाची मागणी
रेल्वे पोलिस स्टेशनचे प्रभारी अधिकारी महेश कुलकर्णी यांनी हवालदार संतोष उफाडे- पाटील, विलास इंगळे, विजय कपिले आणि रेल्वे सुरक्षा बलाचे सागर वर्मा यांना घडलेल्या जुन्या गुन्हे उघडकीस आणण्याच्या सूचना दिल्या होत्या. हद्दीत गस्त घालत असताना दुपारी साडेतीनच्या दरम्यान सदर गुन्ह्यातील संशयित मेनगेट समोर उभा असल्याची बातमी मिळाली. पथकाने सदर ठिकाणी जाऊन संशयितास ताब्यात घेतले. शाहरुख निसार शेख (२५, रा. सुभाष रोड), असे संशयिताचे नाव आहे. त्याने साथीदारासोबत गुन्हा केल्याची माहिती दिली. गुन्ह्यातील मोबाईल जप्त करण्यात आला. आहे.
हेही वाचा: कारमध्ये अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार; आरोपीमध्ये आमदाराच्या मुलाचाही समावेश
Web Title: Railway Police Arrested A Fugitive Suspect Five Months Ago At A Railway Station In Nashik
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..