Agricultural News : दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांची दिवाळी! नाशिक जिल्ह्यात ९३ हजार हेक्टरवरील पंचनामे पूर्ण; आठ दिवसांत मदत मिळण्याची शक्यता
Rapid Crop Damage Assessment Across Nashik District : पावसाने विश्रांती घेतल्याने महसूल आणि कृषी विभागाचे अधिकारी संयुक्तपणे शेतीपिकांच्या नुकसानीचे पंचनामे वेगाने पूर्ण करत आहेत, जेणेकरून दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मदत मिळू शकेल.
नाशिक: जिल्ह्यात पावसाने विश्रांती घेतल्याने नुकसानग्रस्त भागातील शेतीपिकांचे पंचनामे वेगाने हाती घेण्यात आले आहेत. महसूल प्रशासनाने कृषी विभागाच्या सहाय्याने ५६३ गावांमधील ९३ हजार ६०८ हेक्टरवरील पंचनामे पूर्ण केले.