esakal | यंदा चांगला पाऊस? कावळ्यांच्या घरट्यांमुळे वरुणराजाचा अंदाज

बोलून बातमी शोधा

crow nest
यंदा चांगला पाऊस? कावळ्यांच्या घरट्यांमुळे वरुणराजाचा अंदाज
sakal_logo
By
प्रभाकर बच्छाव

येसगाव (जि.नाशिक) : पाऊस (rain) वर्तविण्यासाठी वेधशाळेकडून माहिती मिळते; परंतु ग्रामीण भागात शेतकरी पक्षी व प्राण्यांच्या (farmer) हालचालींत विशिष्ट बदल झाला तर त्यावरून पावसाचा अंदाज(rain forcast) बांधतात. (crow nest)कावळ्याचे घरटे झाडाच्या मध्यभागी असल्यास दमदार पावसाची शक्‍यता असते. पक्ष्यांच्या सूचनेमुळे या वर्षी दमदार पावसाची अपेक्षा शेतकऱ्यांना आहे.(Rain forecast guess due to crows nests)

यंदा चांगला पाऊस पडेल, अशी शक्यता

राज्यात गेल्या वर्षी पावसाने कहर केला होता. पावसामुळे व बिगरमोसमी पावसामुळे खरीप रब्बीचे नुकसान झाले. या हंगामात पाऊस कसा असणार, याविषयी शेतकऱ्यांना उत्सुकता आहे. एप्रिल महिना किंवा मृग नक्षत्रापूर्वी कावळ्यांनी गावातील वेगवेगळ्या झाडांवर पालवी फुटण्याच्या आधी आपले घरटे बांधण्यास सुरवात केली आहे. कोरोनाची शांतता असल्याचे पक्षी झाडावर मनसोक्त घरटी बांधत आहेत. यंदाही मागील वर्षाप्रमाणे घरटी झाडावरील फांद्यांच्या मध्यभागी किंवा जाड फांद्यांवर घरटे तयार केल्याने या वर्षी चांगला पाऊस ९५ ते १०१ टक्के पडेल, अशी शक्यता शेतकऱ्यांकडून व्यक्त होत आहे.

हेही वाचा: खडतर प्रवासातून यश! सहाय्यक पोलिस निरीक्षकपदी नियुक्ती

शेतकऱ्यांच्या अपेक्षा पल्लवित

आजच्या धकाधकीच्या युगात शेतकरी वर्तमानपत्रातील भाकीत, पंचांग, ज्योतिषशास्त्र, मोबाईलवरील हवामान ॲप, सहदेव भाडळी ग्रंथ यावरून पावसाचा अंदाज बांधतात. हा अंदाज पूर्वापार चालत आलेला असल्याने शेतकऱ्यांची त्याला मान्यता असते. मागील वर्षी व या वर्षी कावळ्यांची घरटी पाहून शेतकरी उत्साही आहेत. कावळ्यांची घरटी झाडाच्या शेंड्यावर असल्यास पाऊस असमाधानकारक पडतो किंवा दुष्काळ संभवतो. त्याचप्रमाणे अनेक गावांमध्ये पशुपक्षी, कीटक यांच्या हालचालीवरून जाणकार शेतकरी पावसाचा अंदाज करतात. कावळ्याप्रमाणे टिटवी, पानपेगू, मुंग्या, उंदीर व इतर पक्षी हवामान खात्याप्रमाणे पूर्वसूचना देणारे संकेत देतात. नदीकाठी अंडी घालणारी टिटवी, पावसाळ्यात शेताच्या बांधाकडे अंडी घालते. या वर्षी निंबाच्या झाडाला मोठ्या प्रमाणात निंबोळ्यांचा घोस लागल्याने चांगल्या मुसळधार पावसाची शक्यता आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या अपेक्षा पल्लवित झाल्या आहेत..(Rain forecast guess due to crows nests)