नाशिक: शहर व परिसरात श्रीगणेशाच्या आगमन सोहळ्याला वरुणराजाने हजेरी लावली. दिवसभरात हलक्या ते मध्यम सरी बरसल्या. त्यामुळे गणेशभक्तांचा काहीसा हिरमोड झाला. जिल्ह्यातही ठिकठिकाणी पाऊस पडला. हवामान विभागाने जिल्ह्याला गुरुवारी (ता. २८) आणि शुक्रवारी (ता. २९) येलो अलर्ट दिला आहे.