नाशिक: दोन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसाने पूर्व भागातील तालुक्यातील पिकांना दिलासा मिळाला. नांदगावला तब्बल १०२ मिमी पाऊस झाल्याने वाया जात असलेली पिके वाचली. मालेगाव तालुक्यात पावसाची सरासरी कायम राहिली. कमी पावसाच्या तालुक्यासाठी दोन दिवसांचा पाऊस दिलासा देणारा ठरला. शेतकऱ्यांची आर्थिक हानी टळली.